Join us

शिवसेनेमध्ये फक्त इनकमिंग फ्री - राज ठाकरे

By admin | Published: February 18, 2017 8:43 PM

शिवसेनेमध्ये फक्त इनकमिंग फ्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नावाखाली शिवसेनेचा मुंबईतील महापौर बंगल्यावर डोळा आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १८ - शिवसेनेमध्ये फक्त इनकमिंग फ्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नावाखाली शिवसेनेचा मुंबईतील महापौर बंगल्यावर डोळा आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. भाजप, शिवसेना जाहिरातींवर  कोट्यावधी रुपये खर्च करत आहे, पण मग त्यांच्याकडे हा पैसे येतो कुठून ? असा सवालही त्यांनी विचारला. आज चार बाजूनी भाजपाची होर्डिंग लागली आहेत, मग कॅशलेस भारत कसा होणार, ते स्वत: करोडो रुपये ओतत आहेत असेही ते म्हणाले. 
पुण्यात मुख्यमंत्र्यांची सभा होती, तिथे सगळ्या खुर्च्या रिकाम्या नव्हत्या, माणसं बसली होती. पण कारभार पारदर्शक असल्याने ती माणसे मुख्यमंत्र्यांनापण दिसली नाहीत असा टोला राज यांनी फडणवीसांना लगावला. 
 
राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे : 
- पुण्यात मुख्यमंत्र्यांची सभा होती, तिथे सगळ्या खुर्च्या रिकाम्या नव्हत्या, माणसं बसली होती. पण कारभार पारदर्शक असल्याने ती माणसे मुख्यमंत्र्यांना पण दिसली नाही.
- मुख्यमंत्री म्हणाले नाशिक मी दत्तक घेणार, पण मुळात मोदींनी त्यांना दत्तक घेतले आहे.
- आज चार बाजूनी भाजपाची होर्डिंग लागली आहेत, मग कॅशलेस भारत कसा होणार, ते स्वत: करोडो रुपये ओतत आहेत.
-  थापा मारायला काही सीमा आहे का??? गेल्या २५ वर्षात या पक्षांनी काय केले कोणी ते सांगत नाहीत. फक्त सांगतात काय करणार.
- नाशिकमध्ये आम्ही विकास केला पण हे दोन्ही पक्ष भांडतात. अमित शहा म्हणतात, ही फ्रेंडली मॅच आहे, मग फ्रेंडली मॅचमध्ये एकमेकांची आई-बहीण कशी काढतात.
- राजीनामे का खिशात घेऊन फिरता बाहेर काढा - शिवसेनेवर टीका
 - २५ वर्षांपासून यांची सत्ता आहे, मग करोडो रुपये कुठे गेले? केईममध्ये आयसीयू नाही असं मला कळलं. आरोग्याचा विषय उभा आहे, अनेकांना मलेरिया डेंग्यु होतो, मग काही खासगी हॉस्पिटल निघतात, त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
-  या शहरावर कोणाचेही नियंत्रण नाही. हॉस्पिटलमध्ये काय सुरू असते कोणालाही माहीत नाही.
- मोदी आणि उद्धव ठाकरेंनी भूमिपूजन केले त्यावेळी ढुंकून पहिले नाही.. अजून कोणत्या अपमनाची वाट बघत आहे.
-नाशिक शहरात राज ठाकरेच्या नावाची एक इंच जमीन आढळली तर राजकारण सोडेन.