Join us

हायकोर्टात फक्त ‘मराठा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 3:26 AM

आरक्षणाचा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागताच न्यायालयाच्या बाहेर मराठा समाजाच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला.

मुंबई : आरक्षणाचा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागताच न्यायालयाच्या बाहेर मराठा समाजाच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देऊन मराठा समाजाने आनंद साजरा केला.मराठा समाजातील तरुणांनी भगवे झेंडे फडकावून घोषणाबाजी सुरू केली. मराठा समाजाच्या आंदोलनाची रूपरेषा ठरविणारे राज्यभरातील समन्वयक न्यायालयात हजर होते. आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले, उपोषणास बसलेले कार्यकर्ते न्यायालयाच्या बाहेर गर्दी करून उभे होते. जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्यायालयाच्या आवारापासून लांब जाण्यास पोलिसांनी सांगितले. न्यायालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.निळ्या आकाशात भगवा रंगन्यायालयाच्या बाहेर भगवे झेंडे घेऊन कार्यकर्ते निकालाची वाट पाहत होते. निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागल्यावर कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे फडकाविले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना अभिनंदन करून मोर्चे, आंदोलन, उपोषण या सर्व मेहनतीचे फळ मिळाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.मराठा समाजाला १६ टक्क्यांऐवजी १२ टक्के सरकारी नोकरी आणि १३ टक्के शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्यात आले आहे. एकदंरीत ही लढाई आता सुरू राहणार आहे. ३ टक्के आरक्षण कमी झाले आहे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू मांडणार आहे. लढाई इथे संपली नाही, कायद्याचे भान ठेऊन लढाई लढायची आहे. मराठ्यांना दिलेले आरक्षण सुनियोजित आणि कायदेशीर आहे.- संदीप ढेरे, मराठा महासंघाच्यावतीने बाजू मांडणारे वकीलउच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची फळी उभी करणे हे ध्येय असले पाहिजे. अन्यथा इतरांना जसे आरक्षण मिळाले, तसे यांना आरक्षण मिळाले याच्यापलिकडे याचा काही उपयोग होणार नाही.- डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष,श्रमिक मुक्ती दलराजर्षी शाहू महाराज यांनी विविध समाज घटकांना आरक्षण देण्यास सुरूवात केली.त्यांच्या जयंतीच्या दुसºयाच दिवशी आरक्षणाबाबत झालेल्या निर्णय सर्व मराठा समाजासाठी सकारात्मक ठरणार आहे. परंतु,भारत विकसित राष्ट्र म्हणून एवढे पुढे यावे की कोणालाही आरक्षणाची आवश्यकता भासू नये.- डॉ. शां. ब. मुजुमदार,संस्थापक अध्यक्ष ,सिंबायोसिसऐतिहासिक निर्णय आहे. एवढ्या दिवसांपासूनच्या मेहनतीला फळ मिळाले आहे.- अभिजीत पाटील,मराठा महासंघाच्यावतीने बाजू मांडणारे वकील

टॅग्स :मराठा आरक्षण