विमानात नेता येणार एकच बॅग; सुरक्षिततेचे नवे नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 06:32 IST2024-12-27T06:32:20+5:302024-12-27T06:32:30+5:30
बाकीचे सर्व सामान चेक-इन करावे लागणार

विमानात नेता येणार एकच बॅग; सुरक्षिततेचे नवे नियम
मुंबई : विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि सुरक्षेचा मुद्दा विचारात घेत ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी या विमानतळाची सुरक्षा हाताळणाऱ्या यंत्रणेने प्रवाशांच्या सामानासंदर्भात नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानात स्वत:सोबत केवळ एकच बॅग नेता येईल. बाकीचे सर्व सामान त्यांना चेक-इन करावे लागणार आहे.
विमान कंपन्यांनीही या नव्या धोरणाचे स्वागत करीत सामानविषयक धोरणात बदल केले आहेत. इकॉनॉमी क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता ४० सेंमी लांबी व २० सेंमी रुंदी तसेच ५५ सेंटीमीटर उंची असलेली एक बॅगच विमानात नेता येणार आहे.