विमानतळावर खासगी प्रयोगशाळांचीच उड्डाणे; ३.५९ लाख चाचण्यांतून ७८ कोटींची वरकमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:00 AM2022-01-13T08:00:02+5:302022-01-13T08:00:11+5:30

दरांवर नियंत्रण येईपर्यंत मुंबई विमानतळावर ३,०८,२४४ चाचण्या करण्यात आल्या.

Only private laboratory flights at the airport; Out of 3.59 lakh tests, Rs 78 crore was earned | विमानतळावर खासगी प्रयोगशाळांचीच उड्डाणे; ३.५९ लाख चाचण्यांतून ७८ कोटींची वरकमाई

विमानतळावर खासगी प्रयोगशाळांचीच उड्डाणे; ३.५९ लाख चाचण्यांतून ७८ कोटींची वरकमाई

Next

- सुहास शेलार

मुंबई : मुंबई विमानतळावर ‘रॅपिड आरटी-पीसीआर’चाचणीबाबत प्रवासी सातत्याने आक्षेप घेत असताना खासगी प्रयोगशाळांनी या माध्यमातून जवळपास ७८ कोटींची अतिरिक्त कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शासनाने शुल्काचे नियमन करेपर्यंत गेले वर्षभर प्रयोगशाळा स्वतःच दरपत्रक ठरवत होत्या.

पहिली लाट ओसरल्यानंतर देशभरातील प्रमुख विमानतळांवर रॅपिड आरटी-पीसीआर चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मुंबई विमानतळावर त्यासाठी ४,५०० रुपये दर आकारण्यात येऊ लागला. मात्र, विमान तिकिटाइतके पैसे चाचणीसाठी मोजावे लागत असल्याने प्रवाशांच्या तक्रारींचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे राज्य शासनाने दरांवर नियंत्रण आणण्यास समिती नेमली. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये १,९७५ रुपये दरनिश्चिती केली. पण दरनिश्चिती होईपर्यंत या प्रयोगशाळा चाचणीमागे २ हजार ५२५ रुपये जादा घेत होत्या. 

दरांवर नियंत्रण येईपर्यंत मुंबई विमानतळावर ३,०८,२४४ चाचण्या करण्यात आल्या. त्यासाठी घेतलेल्या अतिरिक्त रकमेनुसार आजवर ७७ कोटी ८३ लाख १६ हजार १०० रुपयांची कमाई या प्रयोगशाळांनी केली आहे. संबंधित चारही प्रयोगशाळांशी याबाबत ई-मेलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

परवानगी कोण देते?
प्रयोगशाळांची शिफारस आयसीएमआरकडून केली जाते. त्यापैकी कोणत्या प्रयोगशाळेला मान्यता द्यावी, याचा निर्णय विमानतळ ऑपरेटर घेतात, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.

चाचण्याबाबत आमच्याकडे खूप तक्रारी यायला लागल्या. त्यामुळे शासनाने समिती गठित करून या चाचण्यांच्या शुल्काचे नियमन करण्याचा निर्णय घेतला. देशात पहिल्यांदाच आपल्याकडे चाचण्यांसाठी दरनिश्चिती करण्यात आली.
- डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तथा आरटी-पीसीआर दर नियंत्रण समितीचे अध्यक्ष
 

Web Title: Only private laboratory flights at the airport; Out of 3.59 lakh tests, Rs 78 crore was earned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.