Join us

तरच स्वस्त आणि मस्त प्रवास अशी ओळख असलेली बेस्ट तरेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:14 AM

स्वस्त आणि मस्त प्रवास अशी ओळख असलेले बेस्ट उपक्रम म्हणजे, मुंबईची दुसरी जीवनवाहिनीच. एक मोठा प्रवासीवर्ग दररोज लोकलमधून धक्के खात प्रवास करतो, तर चाकरमान्यांचा निम्मा भार बेस्ट बसगाड्यांवर आहे.

- शेफाली परब-पंडित

स्वस्त आणि मस्त प्रवास अशी ओळख असलेले बेस्ट उपक्रम म्हणजे, मुंबईची दुसरी जीवनवाहिनीच. एक मोठा प्रवासीवर्ग दररोज लोकलमधून धक्के खात प्रवास करतो, तर चाकरमान्यांचा निम्मा भार बेस्ट बसगाड्यांवर आहे. मात्र, आर्थिक कोंडी आणि ढिसाळ नियोजनामुळे बेस्टचा वेग कमी होऊ लागला आहे. शेअर रिक्षा-टॅक्सीने स्पर्धा निर्माण केली असताना, अ‍ॅप बेस टॅक्सीसेवांनी नाकात दम आणला आहे. उरलीसुरली कसर मेट्रो आणि मोनो रेल्वेने भरून काढली. त्यामुळे बेस्टच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने, ही सार्वजनिक वाहतूकसेवा टिकून राहण्यासाठी वाहतूक अभ्यासक सरसावले आणि पहिल्यांदाच बेस्टला वाचविण्यासाठी ख-या अर्थाने प्रयत्न सुरू झाले आहेत...यासाठी मिळावे बेस्टला जीवदानमुंबईत उड्डाणपूल आणि जोडरस्ते बांधूनही दिवसेंदिवस वाहतूककोंडी वाढत चालली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोटरसायकलची विक्री वाढली असून, बेस्टच्या प्रवाशी संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. बसगाड्यांमध्ये सुधारणा केल्यास, मोटारसायकल आणि ओला, उबेरसारख्या गाड्यांनी प्रवास करणारे मुंबईकरही बस्टकडे पुन्हा वळतील. यामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी आणि वाहतुकीची कोंडीहीफुटेल. मात्र, राज्य सरकारने यासाठी खासगीवाहने वापरणाºयांना गर्दीच्या वेळेत बसनेप्रवास करण्यास प्रोत्साहन देणे आवश्यकआहे.यामुळे कोलमडले बेस्टचे आर्थिक गणितसार्वजनिक वाहतूकसेवा ना नफा ना तोटा तत्त्वावर चालविला जातो. त्यामुळे बेस्ट उपक्रम कधी नफ्यात नव्हताच. तिकिटांचे दरही अत्यंत कमी असल्याने, वाहतूक विभागाचे नुकसान विद्युत पुरवठ्याच्या नफ्यातून भरून काढले जात होते. मात्र, विद्युत विधेयक २००३ मध्ये वीजविभागाचा नफा वाहतूक विभागात समायोजित करण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे बस भाड्यातून मिळणाºया उत्पन्नावर बेस्ट उपक्रम पूर्णपणे अवलंबून आहे.कर्जावर कर्जाचे डोंगरबेस्ट उपक्रमाचे वाहतूक विभागावर २१०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. मार्च महिन्यापासून बेस्टच्या ४४ हजार कर्मचाºयांना पगार वेळेत मिळालेला नाही, तसेच बेस्टला आपल्या बसगाड्यांची देखभाल आणि सेवेचा विस्तार करणेही शक्य झालेले नाही. उत्पन्नाहून खर्चच अधिक असल्याने, दरवर्षी बेस्ट उपक्रमाच्या तुटीमध्ये वाढच होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार किंवा महापालिकेने आर्थिक पाठबळ दिल्यास, बेस्ट उपक्रम या आर्थिक संकटातून बाहेर पडू शकेल.महापालिकेने सुचविलेला पर्यायपालक संस्था असलेल्या महापालिकेकडे बेस्टने दोन हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत मागितली आहे. महापालिकेने यापूर्वी २०११ मध्ये बेस्ट उपक्रमाला १६०० कोटी रुपये कर्ज दिले होते. मात्र, या वर्षीपासून महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत जकात कर बंद होऊन, वस्तू व सेवा कर लागू झाला आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत सुमारे सात हजार कोटी रुपयांचा खड्डा पडणार आहे. ही तूट मोठी असल्याने, नुकसानभरपाई मिळेपर्यंत बेस्टचे ओझे उलण्यास पालिका प्रशासन राजी नाही. याउलट बेस्ट बसभाड्यांमध्ये वाढ करणे आणि स्वेच्छानिवृत्ती, कामगारांचे भत्ते बंद करणे, अशा मार्गाने खर्चात कपात करण्याची शिफारस पालिकेने केली आहे.हे बदल ठरले घातकताफ्यात २८८ वातानुकूलित बसगाड्या दाखल करणे बेस्टला महागात पडले. मात्र, ही सेवा मुंबईत बेस्ट ठरली नाही. या बसगाड्यांच्या देखभालीत कसूर आणि प्रवाशीवर्गाने पाठ फिरविल्यामुळे या बससेवेचा प्रयोग फेल गेला. यामुळे बेस्टला वार्षिक ८० कोटी रुपयांचा तूट होत असल्याने, वातानुकूलित बसगाड्या एप्रिल २०१७ पासून बंद करण्यात आल्या.२००८ नंतर बेस्ट बसगाड्यांची स्थिती देखभालीअभावी बिघडत गेली. सतत बंद पडणाºया बसगाड्या, वाटेतच बिघडणारी बस, नादुरुस्त बसमुळे बसच्या फेºया कमी, परिणामी प्रवाशांना तासन्तास तिष्ठत राहावे लागत असल्याने, प्रवाशी संख्येत घट झाली. गेल्या दशकभरात बेस्टचा प्रवासीवर्ग ४३ लाखांवरून ३० लाखांपर्यंत घसरला आहे.तूट कमी करण्यासाठी बेस्टने अनेक बसमार्ग बंद केले, ज्यात प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असलेल्या बसमार्गांचाही समावेश आहे, तसेच काही बसमार्ग प्रवाशांची मागणी नसतानाही, केवळ राजकीय नेत्यांच्या दबावामुळे सुरू करण्यात आले. मुंबईतील बदल स्वीकारून, त्यानुसार बेस्ट बसगाड्यांमध्ये सुधारणा करण्यात बेस्ट अपयशी ठरली, तसेच बसगाड्यांची योग्य देखभाल न ठेवणे आणि कमकुवत व्यवस्थापन, तिकिटांचे दर वाढविण्यात अनियमितता आदी प्रयोग बेस्टवर ही वेळ आणण्यास कारणीभूत ठरले आहेत.बेस्टला वाचविण्यासाठी अभ्यासकांचा पुढाकार...

मुंबई एन्व्हॉयर्नमेंटल सोशल नेटवर्कचे अध्यक्ष अशोक दातार, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेसच्या अमिता भिडे, शहरअभ्यासक सुधीर बदामी, ट्राफिक इन द एरा आॅफ क्लायमेट चेंज: वॉकिंग सायकलिंग, पब्लिक ट्रान्सपोर्ट नीड प्रायोरिटीचे लेखक विद्याधर दाते, अभ्यासक रजनी देसाई, फोरम आॅफ एन्हायर्नमेंटल जर्नालिस्ट इन इंडियाचे अध्यक्ष डॅरिल डिमाँट, मुंबई विकास समितीचे सदस्य ए.व्ही. शेणॉय, राईट टू द सिटी कॅम्पेनचे सदस्य सिमप्रीत सिंह, तृप्ती अमृतवार वैतिला या वाहतूक अभ्यासकांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि बेस्ट अध्यक्ष अनिल कोकिल यांना निवेदन सादर करून, बेस्टला वाचविण्याचे मार्ग सुचविले आहेत. या अभ्यासकांची बैठक नुकतीच बेस्ट भवनात पार पडली.तज्ज्ञांच्या शिफारशीआर्थिक डोलारा पूर्णपणे कोलमडलेल्या बेस्टची गाडी रुळावर आणण्यासाठी अनेक वेळा चर्चा झाली. मात्र, सरकारी अनास्था, महापालिकेचे दुर्लक्ष, ढिसाळ नियोजन, सबसिडी बंद करणे,नवीन बदल न करणे, बसगाड्यांची दुरवस्था आणि तोट्यात गेलेली वातानुकूलित बस सेवेने तुटीचा आकडा वाढतच राहिला. यामुळे बेस्टला टाळे लागण्याची वेळ आल्याने कामगार रस्त्यावर उतरले. कामगारांच्या संपानंतर झपाट्यानेसूत्रे हलली. मुंबईतील वाहतूक तज्ज्ञांनीही पुढाकार घेत बेस्टला वाचविण्याचे उपाय सुचविले. यात सत्ताधारी शिवसेनेने स्वारस्य घेऊन पहिल्यांदाच वाहतूक तज्ज्ञांना बेस्ट भवनमध्ये चर्चेसाठी बोलाविले. या तज्ज्ञांनी सुचविलेले काही उपाय...महापालिकेकडून मदतीचा हातमहापालिकेने पालकत्व स्वीकारून बेस्टला आर्थिक मदतीचा हात द्यावा. अंदाजे पाच वर्षांत दहा हजार कोटी रुपये पालिकेने दिल्यास, बेस्ट आर्थिक संकटातून बाहेर पडू शकेल. बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रस्तावही बेस्ट समितीमध्येमंजूर करून महापालिकेकडे पाठविण्यात आला आहे.मिनी बससेवामिनी बससेवा वाहतुकीतून मार्ग काढू शकतील. अशा बस सेवा सुरू केल्यास बेस्टचे नुकसान कमी होईल. २०१५ मध्ये दोन वेळा बसभाडे वाढ करण्यात आली. त्यामुळे प्रवाशी शेअर रिक्षाकडे वळले. त्यावर मिनी बस हा पर्याय ठरू शकेल. कमी भाडे आणि छोट्या बसमुळे प्रवाशीवर्ग परतेल, असा विश्वास अभ्यास व्यक्त करीत आहेत.फिडर मार्गाचे भाडे कमी करणेघरापासून रेल्वे स्थानकापर्यंत म्हणजेच फिडर मार्गावरील प्रवाशांची संख्या ७० टक्के आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये फिडर रूटवरील बसभाडे वाढविण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरील प्रवासीवर्ग शेअर रिक्षा व टॅक्सीकडे वळला आहे. बेस्टने उत्पन्नाचे अन्य मार्ग निवडून या मार्गावरील बसभाडे कमी केल्यास, हा प्रवासीवर्ग पुन्हा बेस्टकडे वळेल.पार्किंग उत्पन्नाचा लाभवाजवी दरातील पार्किंग शुल्कातून दरवर्षी सुमारे चारशे कोटी रुपयांचे उत्पन्न जमा होऊ शकते. हे उत्पन्न सार्वजनिक उपक्रमासाठी बाजूला ठेवता येऊ शकेल.स्वतंत्र मार्गिकाबीआरटीएस म्हणजेच स्वतंत्र मार्गिकेची मागणीही पुढे आली आहे. वाहतुकीच्या कोंडीत बस गाड्या मागे पडतात. यामुळे प्रवाशी खासगी पर्याय निवडतात. बेस्ट बसगाड्यांचा प्रवास जलद झाल्यास प्रवाशीवर्गही वाढेल. त्यामुळे बसमार्गांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला. आजच्या घडीला बेस्ट बसचा वेग ताशी १२ कि़मी. आहे. मुंबईच्या रस्त्यांवर खासगी वाहतुकींची संख्या अधिक असल्याने बेस्टची गती मंदावली आहे. पूर्वी ताशी १८ कि़मी. इतका वेग बसगाड्यांचा होता. हा वेग वाढविण्यासाठी बीआरटीएस राबविणे आवश्यक ठरेल. सध्या वांद्रे कुर्ला संकुलात बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका आहे.हायटेक सेवाहायटेक युगात बेस्टची सेवाही आधुनिक होणे अपेक्षित आहे. मोबाइल चार्जिंग सेवा, आरामदायी आसन आदी सेवांचा प्रयोग आता हायब्रीड बस सेवेवर बेस्ट करीत आहे. मात्र, हीच सेवा सर्व बसगाड्यांमध्ये सुरू केल्यास, प्रवासीवर्ग आपोआप वाढेल. बेस्टचा चेहरा बदलला, चांगल्या सुविधा, नियोजनबद्ध बसमार्ग, जीपीएस सेवाद्वारे बससेवा हायटेक करणे शक्य होईल.करांमध्ये सूटबेस्टवरील आर्थिक भारकमी करण्यासाठी अनावश्यक करांचा ओझा राज्य सरकारने कमी करावा. बरेच अनावश्यक कर बेस्टवर आकारले जातात. हे कर रद्द करण्याची मागणी बºयाच वर्षांपासून होत आहे.वेग वाढविणे, वेळ पाळणेपुढच्या काही वर्षांमध्ये मुंबईत आणखी ५० कि़मी. रस्ते वाढतील. मात्र, नवीन उन्नत मार्ग आणि उड्डाणपूल बांधल्यानंतरही वाहनांच्या