...तरच प्रकल्पाला मिळणार गती
By admin | Published: January 1, 2016 01:46 AM2016-01-01T01:46:24+5:302016-01-01T01:46:24+5:30
कोस्टल रोडचा पर्यावरणावरील परिणामांचा अभ्यास महिन्याभरात पूर्ण झाल्यानंतर, महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे़ त्यानुसार, नरिमन पॉइंट
मुंबई: कोस्टल रोडचा पर्यावरणावरील परिणामांचा अभ्यास महिन्याभरात पूर्ण झाल्यानंतर, महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे़ त्यानुसार, नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंतच्या ३३ कि़मी़च्या रस्त्यासाठी सहा ते सात टप्प्यांत काम केले जाणार आहे़
मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरलेल्या सागरी मार्गासाठी राज्य सरकार आग्रही आहे़ या सागरी मार्गासाठी केंद्राच्या पर्यावरण विभागाने अधिसूचना जाहीर केली आहे़ त्यानुसार, या प्रकल्पाच्या पर्यावरण परिणामांचा अभ्यास करण्याचे आदेश पालिकेला केंद्राने दिले आहेत़ हा अभ्यास पुढील महिन्याभराच्या कालावधीत पूर्ण होऊन, निविदा प्रक्रियेला वेग मिळू शकेल़ समुद्रात काही ठिकाणी
भराव तर काही ठिकाणी पूल व भूमिगत रस्ता तयार होणार आहे़ सहा ते सात टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे़
वाहतूककोंडीचे प्रमाण अधिक असलेल्या पट्ट्यामध्ये समुद्री रस्त्याचे काम प्राधान्याने केले जाणार आहे़ तत्पूर्वी येत्या १५ दिवसांमध्ये या रस्त्याचा अंतिम आराखडा तयार होणार आहे़ त्यानंतर, हा आराखडा जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)