रस्ते मार्गावरील रोजची वाहतूककोंडी, लोकल रेल्वेतील गर्दी, पॅसेंजर गाड्यांच्या वेटिंग लिस्ट आणि विमानाचे न परवडणारे दर यांमुळे सर्वसामान्य प्रवासी रोज भरडला जात आहे. विविध उपाय योजूनही यातून फलनिष्पत्ती झालेली नाही, त्यामुळे जलवाहतूक हा यावरील सक्षम पर्याय ठरू शकतो का? याबाबत प्रयोगांना सुरुवात झाली आहे. योग्य धोरणाचा अभाव, जलमार्गांतील अडथळे, पायाभूत सुविधांची वानवा आणि अवाजवी दर यामुळे जलवाहतुकीचे प्रकल्प अजून हवे तसे प्रत्यक्षात आलेले नाहीत. मुंबई-गोवा क्रुझ सेवेत आल्यानंतर, ठाणे पालिकेने मुंबईच्या जलवाहतुकीचे स्वप्न दाखवल्यानंतर जलवाहतूक रेल्वेला सक्षम पर्याय ठरेल का, यावर चर्चा सुरू आहे. त्याचा ऊहापोह...जलवाहतुकीवर दृष्टिक्षेप1केंद्र सरकारने देशांतर्गत जलमार्ग विकासाचे धोरण तयार केलेले आहे. त्यात महाराष्ट्रासह १४ राज्यांनी सहभाग घेत आपापल्या राज्यातील किती नद्यांमधून जलवाहतूक करता येईल, याची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील नद्यांची लांबी ६३१ किलोमीटर आहे, त्यातील ४६२ किलोमीटर जलमार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक करता येऊ शकेल, असा अभ्यास पुढे आला आहे. सर्वाधिक लांबीचे जलमार्ग आसाममध्ये आहेत. तिथे नद्यांची लांबी ५२९० कि.मी. आहे, तर १७१३ कि.मी.चे जलमार्ग आहेत. त्यानंतर आंध्रातील नद्यांची लांबी आहे. तिथे ३५७९ कि.मी.च्या नद्या आहेत; पण जलमार्गासाठी योग्य लांबी फक्त ८०४ कि.मी. आहे.2जलमार्गासाठी योग्य नद्यांचे प्रमाण गोवा राज्यात सर्वाधिक आहे. तेथे नद्यांची लांबी २७३ कि.मी. आहे; पण त्यातील जलमार्ग आहेत २४८ कि.मी.चे. महाराष्ट्राबाबत हे प्रमाण ७३.२ टक्के, तर आंध्रप्रदेशबाबत फक्त २२.५ टक्के इतकचे आहे. नदीच्या प्रवाहाचा वेग, खोली, वर्षभर तिथे असणारी पाण्याची उपलब्धता आणि नदीची वळणे-वाकणे हे सारे भाग यात येतात. जलमार्गांचा प्रवासी तसेच माल वाहतुकीसाठी उपयोग करण्यामुळे खर्चात प्रचंड बचत होणार आहे, हे काही नवे सत्य नाही.3वषार्नुवर्षे तज्ज्ञांना याची कल्पना आहे. अनेक ठिकाणी या क्षेत्राची नैसर्गिकरीत्या वाढ झालेली आहे. केरळमधील बॅकवॉटर जलवाहतूक, गोव्यातील जलवाहतूक ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. भारताच्या उत्तर किनाऱ्यावर त्या मानाने चांगल्या प्रमाणात जलवाहतुकीचा विस्तार झालेला आहे. उर्वरित राज्यांमध्ये देशाच्या अंतर्गत भागात जर जलवाहतुकीचा विस्तार झाला, तर त्याचा फार मोठा लाभ उद्योगांना होऊ शकतो. उदाहरणार्थ जर गोदावरीतून काही टप्प्यात जलवाहतूक सुरू झाली, तर नदीकिनारी वसलेल्या शहरांतील उद्योगांना मोठा लाभ होऊ शकतो. देशांतर्गत जलवाहतुकीचा विकास करण्याची जबाबदारी ‘इंडियन इंटरनल वॉटरवेज डेव्हलपमेंट अथॉरिटी’कडे आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. शिवाय, कोकणात जाणाºया मेल-एक्स्प्रेसच्या वेटिंग लिस्टमुळे प्रवासी नेहमी त्रस्त असतो. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी जलवाहतूक हा सक्षम पर्याय ठरू शकतो. मात्र, नुकत्याच सेवेत दाखल झालेल्या व्यावसायिक जहाजाचे दर प्रतिप्रवासी हजार रुपये इतके आहेत. हे दर रेल्वे आणि खासगी बस वाहतुकीच्या दरांपेक्षा दुप्पट असल्याने सर्वसामान्यांना ते परवडणारे नाहीत. त्यामुळे दर नियंत्रणात आणल्यास जलवाहतुकीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल.- उदय वाघवणकर, जोगेश्वरी (पूर्व)जलवाहतूक ही काळाची गरज आहे. रेल्वेमार्गाची क्षमता पूर्ण झाल्याने अधिक लोकलसाठीचे प्रकल्प अतिशय संथ गतीने सुरू आहेत. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रस्त्यांवरील पायाभूत सुविधांची वानवा आहे. परिणामी, रस्त्यांवर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. मुंबई हे बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते. यासाठी सरकारने जलवाहतुकीला प्राधान्य देत जलद गतीने जलवाहतुकीचे विविध प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे आहे.- संजय कदम, ठाणेजलवाहतूक ही दर्जेदार प्रवासी सेवा ठरू शकेल. मात्र, जास्त पैशांच्या मोहाने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, क्षमतेपेक्षा अधिक लगेज भरणे, सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष न देणे, अशा बाबी टाळायला हव्यात. जहाजाची योग्य वेळी देखभाल-दुरुस्ती करणे, इंधनगळती रोखणे यांमुळे जलवाहतूक प्रवाशांसाठी अधिक सुलभ होऊ शकेल. शाश्वत जलवाहतुकीसाठी भरती-ओहोटीच्या वेळा पाळणे आवश्यक आहे. जलमार्गातील दगड/अडथळे जल-भू सल्लागाराच्या सल्ल्याने काढणे अथवा मार्गात बदल करणे इष्ट ठरेल. जर भरती-ओहोटीचा जास्त परिणाम होऊन फेरा लांबून मारावा लागत असेल, इंधन जास्त लागत असेल तर त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत विचार करायला हवा.- गणेश पद्माकर पाटील, ठाणेकमीतकमी पायाभूत सुविधांमध्ये पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे जलवाहतूक होय. प्रवासी ये-जा करण्यासाठी जेटी उभारून बोटींची योग्य देखभाल-दुरुस्ती केल्यास जलवाहतूक ही सर्वोत्तम सार्वजिनक वाहतूक व्यवस्था होईल. सध्या उपलब्ध असलेल्या बेस्ट, रेल्वे, एसटी, मोनो, मेट्रो या सारख्या वाहतूक व्यवस्थांमध्ये पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधींची गुंतवणूक अपेक्षित असते. शिवाय, हे प्रकल्प पूर्ण करताना जागेसह अन्य अडचणींचा सामना करावा लागतो. जलवाहतुकीसाठी या प्रकल्पांच्या तुलनेत कमी किमतीत पायाभूत सुविधा उभारणे शक्य आहे. जलवाहतूक ही पर्यावरणपूरक असल्याने प्रदूषणाला आळा घालण्यात यश येईल. विदेशात जलवाहतुकीमध्ये प्रयोगात्मक प्रकल्प राबवून त्याचा पर्यटनालादेखील फायदा झाल्याची उदाहरणे आहेत. यामुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक व्यवस्थेसाठी जलमार्ग हा सक्षम पर्याय आहे.- विशाल माने, नवी मुंबईमुंबईत जलवाहतुकीला फार पूर्वी चालना मिळायला हवी होती. रेल्वे, बेस्ट यांसारख्या व्यवस्थेच्या नियोजनशून्य कारभारामुळे जलवाहतुकीचे महत्त्व सर्वसामान्यांना पटत आहे. दक्षिण मुंबई ते बोरीवली-वसई-विरार हा जलमार्ग फायदेशीर ठरेल. दुसरीकडे ठाणे-बोरीवली, ठाणे-मुंबई, नवी मुंबई-मुंबई या विविध जलमार्गांवर प्रवासी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध झाल्यास सर्वसामान्यांचे गर्दीमुक्त प्रवासाचे स्वप्न पूर्ण होईल. तत्पूर्वी जलवाहतुकीचा प्रचार करताना जलवाहतुकीचे भाडे कमी असणे अतिशय महत्त्वाचे आहे. अन्यथा, जलवाहतूक सुरू करून अवाजवी तिकीट दर आकारल्यास त्याच्याकडे सर्वसामान्य प्रवासी पाठ फिरवतील.- दर्शन सावंत, ठाणे (पूर्व)जलवाहतूक सुरू करण्याबाबत मोठ्या चर्चा सध्या सुरू आहेत. नुकतीच कु्रझ सेवा सुरू करण्यात आली. या क्रुझसाठी तब्बल दहा हजारांपर्यंत तिकीट आहे. त्यामुळे ही कु्रझ सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अशा प्रकारच्या क्रुझवर सरकारचे नियंत्रण हवे; किंबहुना त्यांच्या तिकीटदरांवर सरकारचे नियंत्रण हवे. योग्य तिकीटदर, पुरेशा पायाभूत सुविधा असल्यास जलवाहतूक एक सक्षम पर्याय ठरणार आहे. तरंगते हॉटेल सारखे उपक्रम राबवल्यास स्थानिकांनी रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होतील. जलवाहतुकीला चालना दिल्यास जलपर्यटन, जलक्रीडा यासांरखे विदेशात कौतुकास पात्र ठरलेले उपक्रम सात बेटांच्या मुंबईतील शहरांतदेखील स्तुत्य ठरू शकतील.- राहुल होळीकर, मुलुंडसंकलन,महेश चेमटे
...तरच जलवाहतूक सक्षम पर्याय ठरेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 3:56 AM