Join us

नोकरानेच लांबविले चक्क तीन कोटींचे सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 6:01 AM

राफा व्यापाऱ्याच्या दुकानातील नोकराने कागदपत्रांची अफरातफर करीत सुमारे तीन कोटी किमतीचे सोने लंपास केल्याचा प्रकार बोरीवलीत घडला

मुंबई : सराफा व्यापाऱ्याच्या दुकानातील नोकराने कागदपत्रांची अफरातफर करीत सुमारे तीन कोटी किमतीचे सोने लंपास केल्याचा प्रकार बोरीवलीत घडला आहे. याबाबत विक्रम बाफना (वय ४२) याच्याविरुद्ध कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या वर्षीच्या १८ मे ते ६ जून या कालावधीत त्याने हा अपहार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

बोरीवलीत हेमंत गोल्ड नावाच्या दुकानात बाफना अनेक वर्षांपासून कामाला होता. मालकाच्या गैरहजेरीत त्याने कागदपत्रांचा गैरवापर करीत सुमारे तीन ते सव्वा तीन कोटी रुपये किमतीच्या सोन्याचा अपहार केला. सोन्याचा अपहार झाल्याचे मॅनेजर मोहित चौधरी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याप्रकरणी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बाफनाने जामिनासाठी अर्ज केला होता, जो न्यायालयाने फेटाळून लावला असून सध्या तो फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :सोनंचोरगुन्हेगारी