''मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?'' बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या विधानावरून सोशल मीडियावर #आमचीमुंबई हा ट्रेंड सुरू झाला आहे. या विधानावरून कंगनाला ट्रोल केले जाऊ लागले असून मराठी चित्रपट सृष्टीतील काही स्टार्सनी प्रत्यक्ष, तर काहींनी अप्रत्यक्षपणे कंगनाला खडेबोल सुनावले आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनंही त्या विधानाचा जाहीर निषेध करताना कंगनाला कृतघ्न म्हटले.
ताई, जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा; सुबोध भावेनं कंगनाला सुनावलं
कंगनानं नेमकं काय ट्विट केलं?संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावादेखील तिनं केला आहे. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
उर्मिला मातोंडकरनं ट्विट केलं की,''महाराष्ट्र हा भारताचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. मुंबईनं कोट्यवधी भारतीयांना नाव, प्रसिद्धी मिळवून दिली. केवळ कृतघ्न लोकंच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करू शकतात... हे धक्कादायक आहे. #EnoughIsEnough''
सुबोध भावेनंही सुनावलं''ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा.जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा. आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा!,'' अशा शब्दांत भावेनं तिला खडेबोल सुनावले.
...म्हणजे मुंबई आणि इंडस्ट्रीवर माझं प्रेम नाही असा अर्थ होतो का?; कंगनाचा 'रोखठोक' सवाल
संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी