मान्सूनपूर्व वादळी पावसाला सुरुवात; ऑक्सिजन निर्मिती, रुग्णालये व रिफिलिंग उद्योगांसह ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:09 AM2021-05-05T04:09:31+5:302021-05-05T04:09:31+5:30

महावतिरणच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सूचना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रामुख्याने कोविड व इतर सर्व रुग्णालये, ...

The onset of pre-monsoon storms; Maintain power supply to customers including oxygen generation, hospitals and refilling industries | मान्सूनपूर्व वादळी पावसाला सुरुवात; ऑक्सिजन निर्मिती, रुग्णालये व रिफिलिंग उद्योगांसह ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवा

मान्सूनपूर्व वादळी पावसाला सुरुवात; ऑक्सिजन निर्मिती, रुग्णालये व रिफिलिंग उद्योगांसह ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवा

Next

महावतिरणच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रामुख्याने कोविड व इतर सर्व रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती व रिफिलिंग उद्योगांसह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. राज्यात वाढत्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यास महावितरण सक्षम आहे. मात्र, मान्सूनपूर्व वादळी पावसाला राज्याच्या काही भागात सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर सज्ज राहावे, अशी सूचना महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात संचारबंदी व ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढत असून, काही भागात मान्सूनपूर्व वादळी पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज राहावे. वादळी पाऊस व अन्य कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्यास युद्धपातळीवरील दुरुस्ती कामांद्वारे किंवा पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्याची कार्यवाही करावी. सोबतच वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने करावीत. सध्याची कोरोना लाट महावितरणकरिता अतिशय कसोटीची आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सेवा देतांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घ्यावी.

कोविडबाधित कर्मचारी व कुटुंबियांना सर्व प्रकारची आवश्यक वैद्यकीय व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी परिमंडल स्तरावरील समन्वय कक्षांमार्फत कामे सुरू आहेत. नियमित व कंत्राटी सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्याची गंभीरपणे काळजी घ्यावी. थोडीही लक्षणे दिसल्यावर ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्व कर्मचाऱ्यांनी स्वत:सोबतच आपल्या सहकाऱ्यांची व कुटुंबियांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

.................................

Web Title: The onset of pre-monsoon storms; Maintain power supply to customers including oxygen generation, hospitals and refilling industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.