मनसेसमोर सर्व पर्याय खुले! मुंबई महापौर निवडणुकीत नवा ट्विस्ट
By Admin | Published: March 3, 2017 08:12 PM2017-03-03T20:12:56+5:302017-03-03T20:20:19+5:30
आम्हाला कुणीही गृहित धरू नयेत, आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत मनसेने
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसा मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना आणि भाजपाकडून मुंबईचे महापौरपद मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच आम्हाला कुणीही गृहित धरू नयेत, आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत मनसेने मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट आणला आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई म्हणाले, आम्हाला कुणीही गृहित धरू नये, आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. पाठिंब्यासाठी आम्हाला अद्याप कुणाकडूनही प्रस्ताव मिळालेला नाही. आम्हाला कुठलाही पक्ष राजकीयदृष्ट्या अस्पृश्य नाही. मात्र कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत अंतिम निर्णय मनसेचे अध्यक्ष राज
ठाकरे घेतील.
दरम्यान मनसेच्या भूमिकेमुळे मुंबईच्या गादीवर आपला महापौर बसवण्यासाठी उत्सुक असलेल्या भाजपाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तर गेल्या काही दिवसांत एकेक नगरसेवक जोडत आपले संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवसेनेच्या चिंता वाढल्या आहेत.