नवीन महाविद्यालयांचा मार्ग मोकळा? महिला, रात्र महाविद्यालयांविषयी तरतूद, बृहत् आराखड्याला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 05:25 AM2017-09-13T05:25:06+5:302017-09-13T05:25:06+5:30
मुंबई विद्यापीठाच्या निकालांना झालेल्या गोंधळामुळे विद्यापीठात विशेष सिनेट सभेला राज्यपाल मंजुरी देत नव्हते. अखेर मंगळवारी फोर्ट कॅम्पसमध्ये सिनेटची विशेष बैठक पार पडली असून, त्यात बृहत् आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या बृहत् आराखड्यातील तरतुदींनुसार, महिलांसाठी विशेष महाविद्यालय, रात्र महाविद्यालय आणि आर्किटेक्चरसारख्या ४० ते ४५ महाविद्यालयांच्या तरतुदी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालांना झालेल्या गोंधळामुळे विद्यापीठात विशेष सिनेट सभेला राज्यपाल मंजुरी देत नव्हते. अखेर मंगळवारी फोर्ट कॅम्पसमध्ये सिनेटची विशेष बैठक पार पडली असून, त्यात बृहत् आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या बृहत् आराखड्यातील तरतुदींनुसार, महिलांसाठी विशेष महाविद्यालय, रात्र महाविद्यालय आणि आर्किटेक्चरसारख्या ४० ते ४५ महाविद्यालयांच्या तरतुदी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मंगळवारी झालेल्या सिनेटच्या विशेष बैठकीत बृहत् आराखड्याला मान्यता देण्यात आली. आता हा आराखडा सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. सरकारकडे आराखडा मान्य झाल्यानंतर विद्यापीठातर्फे जाहिरात काढण्यात येईल. त्यानंतर महाविद्यालये अर्ज करतील, पुढच्या काही दिवसांतच ही प्रक्रिया सुरू होईल, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाला ३१ जुलैपर्यंत हा आराखडा मंजूर करून घ्यायचा होता. पण, निकाल गोंधळामुळे हा लेटमार्क लागला होता. आता त्याचा मार्ग मोकळा झाल्याने विद्यार्थ्यांनाही काहीसा दिलासा मिळणार आहे.
1गेल्या चार वर्षांपासून बृहत आराखड्याला मंजुरी मिळाली नव्हती. सिनेटची बैठक झाली नसल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून नवीन महाविद्यालये, अभ्यासक्रम, तुकड्यांना मान्यता मिळालेली नव्हती. अखे मंगळवारी बैठकीला मुहूर्त मिळाल्याने नवी महाविद्यालये, अभ्यासक्रम, तुकड्यांचा मार्ग मोकळा झाला.
2मुंबई विद्यापीठाने निकाल उशिरा लावून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. आता पुनर्मूल्यांकनाचे अर्ज मागवूनही पुनर्मूल्यांकन सुरू केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अजून नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांच्या हातात निकाल नसल्याने विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण आणि नोकरी असा दोन्हींचा मार्ग बंद झाला आहे.