गोरेगाव बांगुर नगर येथील खेळाचे मैदान स्थानिकांसाठी खुले करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:05 AM2021-02-12T04:05:52+5:302021-02-12T04:05:52+5:30

शिवसेनेची पी दक्षिण कार्यालयावर जोरदार निदर्शने लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेना गोरेगावच्या वतीने लक्ष्मी पार्क मैदान बांगुरनगर येथील ...

Open playground at Goregaon Bangur Nagar for locals | गोरेगाव बांगुर नगर येथील खेळाचे मैदान स्थानिकांसाठी खुले करा

गोरेगाव बांगुर नगर येथील खेळाचे मैदान स्थानिकांसाठी खुले करा

Next

शिवसेनेची पी दक्षिण कार्यालयावर जोरदार निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना गोरेगावच्या वतीने लक्ष्मी पार्क मैदान बांगुरनगर येथील सर्वसामान्य स्थानिक नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पी / दक्षिण विभाग कार्यालयावर शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले.

उपरोक्त विषयाबाबत मैदानाचे आरक्षण हे खेळाचे मैदान आहे. तथापि सदर मैदानाचा वापर व्यावसायिक बाबीसाठी खुलेआम करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. या मैदानात नुकत्याच उभारण्यात आलेल्या अनधिकृत सिने स्टुडिओला भयंकर मोठी आग लागली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही बाब निश्चितच खेदजनक असून याबाबत ठोस निर्णयात्मक कार्यवाही करणे नितांत गरजेचे आहे. याविषयी मैदान आता नियमानुसार आरक्षणान्वये स्थानिक रहिवाशांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना गोरेगावच्या वतीने पी / दक्षिण विभाग महानगर कार्यालयावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Open playground at Goregaon Bangur Nagar for locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.