बोरीवलीत प्रिस्क्रिप्शनशिवाय व्हायग्राची खुलेआम विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 04:13 AM2019-02-09T04:13:11+5:302019-02-09T04:13:24+5:30

पुरुषांची कामवासना वाढवणारी एलोपथिक औषधी ( व्हायग्रा) ही आयुर्वेदिक औषधी असल्याचे सांगत डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय बोरिवलीत त्यांची खुलेआम विक्री केली जात होती.

Open Sale of Viagra without Borivali Prescription | बोरीवलीत प्रिस्क्रिप्शनशिवाय व्हायग्राची खुलेआम विक्री

बोरीवलीत प्रिस्क्रिप्शनशिवाय व्हायग्राची खुलेआम विक्री

googlenewsNext

- गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई -  पुरुषांची कामवासना वाढवणारी एलोपथिक औषधी ( व्हायग्रा) ही आयुर्वेदिक औषधी असल्याचे सांगत डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय बोरिवलीत त्यांची खुलेआम विक्री केली जात होती. हा प्रकार अन्न आणि औषध प्रशासनाला ( एफडीए ) समजताच त्यांनी रंगेहाथ विक्रेत्याला पकडून त्याच्याविरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
बोरिवली पश्चिमेच्या साई शॉपिंग मॉलजवळ भगवती आयुर्वेदिक स्टोअर आहे. या दुकानात कामवासना वाढविणारी आयुर्वेदिक औषधे उपलब्ध असल्याचे दुकानदार जयप्रकाश छगनलाल शाह नागरिकांना सांगायचा. औषधांच्या क्षमतेवरून त्याची किंमत ठरलेली असायची. यात ५०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतच्या कॅप्सूलचा समावेश होता.
एफडीएचे औषध निरीक्षक रुद्रमणी पोंगळे यांना याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्यांचे सहकारी औषध निरीक्षक (गुप्तवार्ता) को.गो. गादेवार, औषध निरीक्षक एस. ए. नरवणे, ए.एस. गोडसे, , डी.आर. मालपुरे यांच्या मदतीने याठिकाणी सापळा रचला. यातील एकाने शाहच्या दुकानात जाऊन कामवासना एक तासासाठी वाढविणाऱ्या गोळीची मागणी केली. तेव्हा शाहने त्यांना ५०० रुपये किमतीच्या दोन गोळ्या
दिल्या.
या गोळ्या, कॅप्सूल शाह याच्या दुकानात मोठमोठ्या बरण्यांमध्ये त्याने साठवुन ठेवल्या होत्या. त्यानुसार शाह याला रंगेहाथ पकडण्यात आले. तो विकत असलेल्या औषधामध्ये याचे अधीक प्रमाण असल्याचे त्याने कबुल केले. त्यानुसार त्याच्याकडील औषधांचे नमुने एफडीएने पडताळणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या औषधांची विक्री तो डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय करत होता हे देखील उघड झाले आहे.

ही औषधे घातक ?

व्हायग्रा या औषधाचे सेवन परवानाधारी डॉक्टरच्या सुचनेनुसार योग्य डोसच्या प्रमाणात घेणे आवश्यक असते. याचे अतिसेवन केल्याने अंधुक दिसणे, चक्कर येणे, उलटी होणे, अशक्तपणा येणे आणि वेळीस श्वास घेण्यासही अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याचे सेवन करणाºयाच्या जीवाला धोका उदभवू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणात तरुण शाहकडून या गोळ्यांची खरेदी करत होते. त्यामुळे शाह त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Open Sale of Viagra without Borivali Prescription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medicinesऔषधं