Join us

खुल्या व्यायामशाळेवरून रंगला राजकीय आखाडा

By admin | Published: July 18, 2015 4:02 AM

शिवसेना युवराजांच्या दबावामुळे आयुक्तांनी मरिन ड्राइव्ह येथे खुल्या व्यायामशाळेला परवानगी दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून आता होऊ लागला आहे़ याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा

मुंबई: शिवसेना युवराजांच्या दबावामुळे आयुक्तांनी मरिन ड्राइव्ह येथे खुल्या व्यायामशाळेला परवानगी दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून आता होऊ लागला आहे़ याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला. तसेच प्रशासनाने पदपथावरील व्यायामशाळा न हटविल्यास आमच्या स्टाईलने कारवाई करू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे़ त्यामुळे खुल्या व्यायामशाळेवरून राजकीय आखाडा रंगात आला आहे़अभिनेता दिनो मोरिया यांच्या संकल्पनेतून मुंबईत पाच ठिकाणी पदपथावर खुली व्यायामशाळा सुरू करण्यात येत आहे़ मात्र उद्घाटनाआधीच मरिन ड्राइव्ह येथील व्यायामशाळा सी विभाग कार्यालयाने उचलली़ नाचक्की करणाऱ्या या घटनेमुळे शिवसेनेने काही तासांच पालिका प्रशासनावर दबाव आणून ही व्यायामशाळा जागेवर बसवून घेतली़ या व्यायामशाळेला पालिकेची पूर्वपरवानगी असल्याचे सांगण्यात येत आहे़ या व्यायामशाळेला परवानगी नसल्याचा दावा २०१३ मधील आयुक्तांच्या पत्राचा दाखला देत काँग्रेसने केला आहे़ काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन ही व्यायामशाळा पदपथांवरून हटवा अन्यथा आम्हालाच कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला़ तर राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी पदपथावरील या अतिक्रमणाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे संकेत दिले आहेत़ (प्रतिनिधी)खुली व्यायामशाळा बेकायदेशीर ?या खुल्या व्यायामशाळेला परवानगी देण्यास पुरातन वास्तू समितीने दोन वर्षांचा कालावधी लावला़ तसेच अशा व्यायामशाळेला उद्यानात परवानगी देण्यात यावी, असा अहवाल अतिरिक्त आयुक्तांनी दिला होता़ या व्यायामशाळांना परवानगी देण्यात येत नाही, असे पत्र तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांनी २०१३ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना दिले होते़ सी विभाग कार्यालयाचे स्पष्टीकरण-या कारवाईबाबत माफी मागणाऱ्या सी विभागाच्या साहाय्यक आयुक्तांना दिलेले स्पष्टीकरण संभ्रमात टाकणार आहे़ या फिटनेस सेंटरसाठी सी विभाग कार्यालयाकडून परवानगी घेण्यात आलेली नव्हती़ कागदपत्रानुसार ही परवानगी केवळ ‘ए’ विभागापुरती मर्यादित आहे़ -सी विभागाकडून परवानगी घेतलेली नाही़ मात्र आयुक्तांच्या आदेशानुसार त्याच जागी व्यायामशाळा बसविण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण सी विभागाने आयुक्तांना पाठविलेल्या अहवालातून दिले आहे़