- अजय परचुरेमुंबई : ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे २२ फेब्रुवारीला नागपुरमध्ये उद्घाटन होणार आहे. याची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे.२२ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता नागपूर शहरात नाट्य दिंडीने संमेलनाची सुरुवात होईल. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता रेशीमबाग मैदानातील राम गणेश गडकरी नाट्यनगरीत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते उद्घाटन होईल. नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित असतील. समारोप २४ फेब्रुवारीला सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.‘पुन्हा सही रे सही’चे आकर्षणअभिनेता भरत जाधव यांच्या अफलातून अभिनयाने गाजलेले ‘पुन्हा सही रे सही’ हे व्यावसायिक नाटक संमेलनाचे प्रमुख आकर्षण असेल. तसेच आनंदवन येथील विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वरावानंदन या संगीतमय कार्यक्र माने २५ फेब्रुवारीला पहाटे नाट्यसंमेलनाचे सूप वाजणार आहे. ज्येष्ठ गायिका देवकी पंडित यांच्या सुफी गीतांवर आधारित मुक्ती या संगीतमय कार्यक्र माची पर्वणीही नागपूरकरांना अनुभवायला मिळेल. विदर्भातील गाजलेल्या झाडेपट्टी रंगभूमीवरील अस्सल नाटकाचा आस्वादही घेता येईल. विदर्भातील महाविद्यालयीन तरु णांच्या गाजलेल्या एकांकिकाही संमेलनात सादर होतील. या नाट्यसंमेलनात तेरवं ही नाटिका सादर होईल. या नाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुली आणि सुना यात अभिनय करतील. तर कोल्हापूरच्या वारणा संस्थेची लहान मुले गीतरामायण सादर करतील.दिग्गज नाट्यकर्मींचा होणार विशेष सन्मान९९ व्या नाट्यसंमेलनात अनेक दिग्गज नाट्यकर्मींचा विशेष सन्मान करण्यात येईल. ज्येष्ठ नाट्यकर्मी, दिग्दर्शक आणि नुकताच पद्मश्री हा मानाचा पुरस्कार जाहीर झालेले वामन केंद्रे तसेच नुकत्याच संपन्न झालेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार मिळवलेले लेखक अभिराम भडकमकर आणि लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे यांचाही सन्मान करण्यात येईल.
नाट्यसंमेलनाचे २२ फेब्रुवारीला उद्घाटन; नाट्य दिंडीने नागपुरात होणार ९९व्या संमेलनाची नांदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 1:20 AM