Join us

साध्या वेषातील अधिकारी करणार कारवाई

By admin | Published: December 10, 2014 2:04 AM

भाडे नाकारणा:या टॅक्सी आणि रिक्षाचालकांची माहिती घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी वडाळा आरटीओने आता कंबर कसली आहे.

मुंबई : भाडे नाकारणा:या टॅक्सी आणि रिक्षाचालकांची माहिती घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी वडाळा आरटीओने आता कंबर कसली आहे. आरटीओचे अधिकारी चालकाने भाडे नाकारल्यास त्याच्यावर कारवाई करीत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम उघडण्यात आली आहे. 
रिक्षा आणि टॅक्सीचालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार वारंवार घडत असून, त्यांच्याविरोधात वाहतूक पोलिसांकडे आलेल्या तक्रारींनुसार कारवाई केली जाते. तरीही भाडे नाकारण्याचे प्रकार मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. 
नुकत्याच एमएमआरटीएच्या झालेल्या बैठकीत भाडे नाकारणा:या चालकांविरोधात वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या संयुक्त मोहिमेत कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार वडाळा आरटीओने मोहीम सुरू केली असून, आरटीओचे अधिकारी साध्या वेषात प्रवासी म्हणून वावरत टॅक्सी किंवा रिक्षा पकडत आहेत. एक आरटीओ इन्सपेक्टर आणि दोन कर्मचारी या मोहिमेत सहभागी होत असून, स्थानिक वाहतूक पोलिसांचाही समावेश केला जात असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)