मुंबई : १८व्या शतकातील मोटारी आणि दुचाकी पाहण्याची संधी ‘हेरिटेज आॅन व्हील्स’च्या माध्यमातून मुंबईकरांना मिळणार आहे. नेहरू विज्ञान केंद्र, व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब आॅफ इंडिया यांच्या सहयोगाने आयोजित या प्रदर्शनात जवळपास २७ मोटारी आणि १२ दुचाकींचा समावेश आहे. या प्रदर्शनात मोटारींच्या निर्मितीचे साल आणि माहितीचा तपशील देण्यात आला आहे.गुरुवारी उद्घाटन झालेल्या या प्रदर्शनाला मुंबईकरांची पसंती मिळत आहे. शिवाय, कल्याण-डोंबिवली, भांडुप येथील शाळकरी विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनाला शुक्रवारी हजेरी लावून या मोटारी-दुचाकी पाहण्याचा आनंद लुटला. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांच्या प्रसिद्ध ‘बॉबी’ चित्रपटातील दुचाकीही येथे पाहायला मिळते.या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्सुकता, भल्या मोठ्या मोटारी पाहून चेहºयावर आलेली विस्मयकारक भावना पाहून कृतज्ञ वाटते, असे नेहरू विज्ञान केंद्राचे शिक्षण अधिकारी चारुदत्त पुल्लीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रदर्शन १ एप्रिलपर्यंत स. १०.३० ते सायंकाळी सहा या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.
१८व्या शतकातील दुर्मीळ वाहने पाहण्याची मुंबईकरांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 2:24 AM