राज्यात नोकरीसाठी भूमिपुत्रांनाच संधी! सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 07:17 AM2020-07-07T07:17:52+5:302020-07-07T07:18:33+5:30

पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची, किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. या पोर्टलच्या बाबतीत असे अजिबात होऊ नये, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

Opportunity for Local people for jobs in the state! An important decision of the government | राज्यात नोकरीसाठी भूमिपुत्रांनाच संधी! सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात नोकरीसाठी भूमिपुत्रांनाच संधी! सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Next

मुंबई : राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून, ‘महाजॉब्स’ पोर्टल सुरू करण्यात आले असून या माध्यमातून नोकरी मिळविण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल) बंधनकारक केले आहे, अशी महिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोकरी गमावलेल्या राज्यातील युवकांना नोकरीची संधी मिळणार आहे.
पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची, किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. या पोर्टलच्या बाबतीत असे अजिबात होऊ नये, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. नोकरी देणारे व मागणारे यांना एकत्र आणण्यासाठी हे पोर्टल असून याचा फायदा उद्योजक व बेरोजगार युवकांना होईल, असे सुभाष देसाई म्हणाले.

५० हजार रोजगार उपलब्ध

राज्यातील उद्योगांत ५० हजार रोजगार उपलब्ध आहेत. महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी १७ क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे.
स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे. याद्वारे राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी मदत होईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

मान्यवरांसह युवकही सहभागी
या कार्यक्रमास कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. पी. अनबलगन,
विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह उद्योजक आणि सध्या रोजगार संधीच्या शोधात असलेले युवक राज्यभरातून सहभागी झाले होते.

Web Title: Opportunity for Local people for jobs in the state! An important decision of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.