तात्याराव लहाने यांना भूमिका मांडण्याची संधी
By admin | Published: April 12, 2016 03:22 AM2016-04-12T03:22:35+5:302016-04-12T03:22:35+5:30
जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची बाजू ऐकल्याशिवाय चौकशी केली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने डॉ. लहाने यांना भूमिका स्पष्ट
मुंबई : जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची बाजू ऐकल्याशिवाय चौकशी केली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने डॉ. लहाने यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे लहाने त्यांची भूमिका आज उच्च न्यायालयापुढे मांडणार आहेत.
मार्डच्या संपामुळे गरीब रुग्णांचे हाल झाल्याने सामाजिक कार्यकर्ते अफाक मांडविया यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. डॉक्टरांनी संपावर तक्रार निवारण समितीकडे तक्रार करायला हवी होती, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील दत्ता माने यांनी केला. समितीमध्ये डॉ. लहाने यांचा समावेश आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळणार नाही, असे म्हणणे मार्डच्या वकिलांनी शनिवारी मांडले. या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्या. मोहित शहा किंवा अन्य निवृत्त न्यायाधीश असावेत, अशीही मागणी मार्डने केली. डॉ. लहाने यांचे वकील अॅड. शेखर जगताप यांनी आदेश देण्यापूर्वी
डॉ. लहाने यांची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती न्यायालयाच्या खंडपीठाला केली. (प्रतिनिधी)