Join us  

पोलिसांना फॉरेन्सिकमध्ये संधी

By admin | Published: March 29, 2017 3:50 AM

न्याय साहाय्यक वैधानिक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) मध्ये पोलीस कॉन्स्टेबलना साहाय्यक तंत्रज्ञ म्हणून काम

मुंबई : न्याय साहाय्यक वैधानिक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) मध्ये पोलीस कॉन्स्टेबलना साहाय्यक तंत्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. राज्यभरात निर्माण करण्यात आलेल्या ४५ मोबाइल सपोर्ट युनिटमध्ये त्यांची तात्पुरत्या स्वरूपात साहाय्यक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. विज्ञान शाखेतील पदवीधर व पाच वर्षांहून अधिक काळ सेवा झालेल्या पोलिसांनी विभागाकडे अर्ज करावयाचा आहे. निवड झालेल्यांना गुन्ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. न्याय वैद्यक साहाय्यक प्रयोगशाळा संचालनालय या स्वतंत्र विभागाच्या प्रमुख पदावर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या विभागाकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने त्याची पूर्णवेळ नियुक्ती होईपर्यंत पोलीस दलातील उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. (प्रतिनिधी)