पेट प्रवेश परीक्षेच्या सरावासाठी पुन्हा संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:06 AM2021-03-19T04:06:48+5:302021-03-19T04:06:48+5:30
२१ मार्चपर्यंत देता येणार सराव परीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठाने पीएच.डी. आणि एम. फिल. प्रवेश परीक्षेसाठीचे ...
२१ मार्चपर्यंत देता येणार सराव परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाने पीएच.डी. आणि एम. फिल. प्रवेश परीक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले असून, या परीक्षेच्या नियोजनाचा भाग म्हणून विद्यापीठाने १२ ते १७ मार्चदरम्यान सराव परीक्षेचे आयोजन केले होते. या दरम्यान काही विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या सराव परीक्षा दिली. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सराव परीक्षा दिली नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्यात येईल. त्यांनी २१ मार्च २०२१ पर्यंत सराव परीक्षा देण्याचे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले. ज्यांनी सराव परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा सराव परीक्षा देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठाने पेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून, यानुसार २५ मार्च रोजी एम. फिल., तर २६ आणि २७ मार्च २०२१ रोजी पीएच.डी. प्रवेश परीक्षा होणार आहे. एकूण ७९ विषयांसाठी ही परीक्षा ऑनलाईन होईल.
* विद्यार्थ्यांना समस्या आल्यास संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक
०२२२२८८५७०५०, ०२२२८८५७०४८, ०२२२८८५७०४३, ०२२२८८५७०३४, ०२२८८५७०३५, ८२९१८९२९८, ७७००९०७०७९, ८६५७७४६१८६, ९३७२५११८४६, ९३७२५११८४७