प्रतिष्ठेच्या सिस्को युथ लीडरशिप पुरस्काराची ‘मैना’ संस्थेला संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 04:59 AM2020-11-22T04:59:20+5:302020-11-22T04:59:48+5:30
तुमचे एक मत देशभरातील अडीच लाख महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या या फाऊंडेशनला सदरचा पुरस्कार मिळवून देऊ शकते.
मुंबई : जगात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ग्लोबल सिटीझन प्राईजच्या सिस्को युथ लीडरशिप अवॉर्डच्या अंतिम स्पर्धेसाठी नामांकन मिळालेल्या तीन संस्थांमध्ये मैना महिला फाऊंडेशन; मुंबईला नामांकन मिळाले आहे. जगातील सर्वात प्रेरणादायी युवानेतृत्वासाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे. या फाऊंडेशनच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहानी राजीव जलोटा आहेत.
तुमचे एक मत देशभरातील अडीच लाख महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या या फाऊंडेशनला सदरचा पुरस्कार मिळवून देऊ शकते. त्यासाठी तुम्हाला https://bit.ly/35CCfHr या लिंकवर अकाऊंट तयार करून मत द्यावयाचे आहे. आपले एक मत एका महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत एका नामवंत संस्थेला पुरस्कार मिळवून देऊ शकेल. हानी जलोटा या १५ वर्षांच्या असल्यापासून शहरांमधील झोपडपट्टयांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी कार्य करीत आहेत.