मुंबई : खेड्यापाड्यात कला जोपासणाऱ्या सोनारांच्या दागिन्यांची निर्यात होण्यासाठी ‘डॉमेस्टिक गोल्ड काऊन्सिल’ची स्थापना केली जाईल. या परिषदेवरील पदाधिका-यांची नियुक्ती निवडणुकीने होईल, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी केली.जेम्स अॅण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिलचा (जीजेइपीसी) ४४ वा पुरस्कार वितरण समारंभ प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. खासदार पूनम महाजन, जीजेइपीसीचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल, उपाध्यक्ष कोलिन शाह, पुरस्कार उप समितीचे निमंत्रकव ज्येष्ठ दागिने तज्ज्ञ किरीट भन्साळी, अशोक गजेरा, सब्यासाची रे यावेळी मंचावर होते.प्रभू म्हणाले, जागतिक व्यापार क्षेत्रात भारताचे स्थान कणखर करण्यासाठी निर्यातवाढ अत्यावश्यक आहे. त्यामध्ये हिरे व दागिन्यांच्या उद्योगाची भूमिका महत्त्वाची असेल. गावागावात कार्यरत असलेल्या सोनारांच्या कलेला आधुनिक डिझाइन्सची जोड मिळाल्यास त्यांचे आंतरराष्टÑीय स्तरावर ब्रॅण्डिंग होऊन निर्यात सहज शक्य आहे. यासाठीच विशेष परिषद स्थापन होईल. सर्व ज्वेलरी संघटना या परिषदेचे मतदार असतील. त्यांनी निवडून दिलेले पदाधिकारीच या परिषदेवर असतील.कार्यक्रमात सुरुवातीला प्रमोद अग्रवाल यांनी अलिकडे उघडकीस आलेल्या घोटाळ्यांमुळे बँकांकडून कर्ज मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यावर प्रभू म्हणाले, हिरे व्यावसायिक एक रुपयासुद्धा कर्ज थकवित नाहीत, असा माझा अनुभव आहे. हे क्षेत्र देशाच्या निर्यातीत ७ टक्के योगदान देते. एका घटनेमुळे सरसकट सर्वांचेच कर्ज नाकारणे पूर्णपणे अयोग्य आहे. बँकांकडून हिरे, दागिने व्यावसायिकांना सुलभरित्या कर्ज मिळावे, यासाठी बँका व व्यावसायिक यांच्या समन्वयाने कर्ज वितरणाचे नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करता येतील का, याबाबत अभ्यास सुरू आहे. अर्थमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. या क्षेत्रासाठीचे कर्ज वितरण प्राधान्य श्रेणीत असावे, असा प्रयत्न केला जाईल.किरीट भन्साळी यांच्यावर स्तुतीसुमनेकार्यक्रमात ४२ पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्वोत्तम कर्ज वितरण श्रेणीत स्टेट बँकेला चार पुरस्कार मिळाले. ज्येष्ठ हिरे व्यावसायिक कानूभाई बी. शाह यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. देशभरातील हजारो व्यावसायिकांमधून एवढ्या पुरस्कारांची अूचक निवड केल्याबद्दल पुरस्कार उप समितीचे संयोजक किरीट भन्साळी यांचे उपस्थितांनी कौतुक केले. जेमोलॉजिकल इन्स्ट्यिूट आॅफ अमेरिका (इंडिया) या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका निरुपा भट, स्टेट बँकेचे माजी एमडी ए. कृष्णकुमार व डीएनबी इंडियाच्या मुख्य वित्त अधिकारी जयश्री रामस्वामी हे पुरस्कारांसाठी ज्युरी होते.सिंधुदुर्गात होणार दागिन्यांची निर्मितीहिरे व दागिन्यांच्या क्षेत्रात पुढील पाच वर्षांत १३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीसह ५० लाख नवीन रोजगार निर्मिती करण्याचे लक्ष्य ‘जीजेईपीसी’ने समोर ठेवले आहे. त्याअंतर्गत मुंबईसह देशभरात १३ सुविधा केंदे्र उभे राहणार आहेत. त्याचवेळी सिंधुदुर्गसारख्या दुर्गम भागात दागिने निर्मिती केंद्र सुरू करण्यासंबंधीही विचार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
छोट्या सुवर्णकारांनाही निर्यातीची संधी - सुरेश प्रभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 3:02 AM