Join us

विद्यार्थ्यांना सिडनीत संशोधनाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 4:33 AM

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वीच आॅस्ट्रेलियातील विद्यापीठाशी करार केला आहे. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठातील तब्बल २० विद्यार्थ्यांना सिडनी येथे जाऊन संशोधन करण्याची संधी मिळणार आहे

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वीच आॅस्ट्रेलियातील विद्यापीठाशी करार केला आहे. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठातील तब्बल २० विद्यार्थ्यांना सिडनी येथे जाऊन संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना २० जानेवारीपर्यंत विद्यापीठात अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले.गेल्या काही वर्षांत पदव्युत्तर आणि पीएच.डी.चे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यातील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर संशोधनात वाढ होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठातर्फे २० विद्यार्थ्यांना सिडनीमध्ये संशोधनाला जाण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी सिडनी येथील विद्यापीठाशी मुंबई विद्यापीठाने करार केला आहे.यामुळे दोन देशांतील संबंध सुधारण्यास तसेच विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. राज्यात दरवर्षी सर्वसाधारणपणे ७० लाख विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेतात. तरीही पदव्युत्तर शिक्षण घेऊन संशोधन करणाºयांची संख्या कमी आहे. आता विद्यार्थी परदेशात जाऊन संशोधन करणार आहेत. याचा नक्कीच फायदा होईल. या विद्यार्थ्यांचे संशोधन देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही विद्यापीठाने व्यक्तकेला आहे.