एलएलबीच्या सीईटी अर्जात दुरुस्तीची ३ एप्रिलपर्यंत संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 09:12 IST2025-03-31T09:12:24+5:302025-03-31T09:12:47+5:30
Mumbai News: एलएलबी ३ वर्ष आणि ५ वर्ष अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या परीक्षेचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्तीसाठी आज, १ ते ३ एप्रिलदरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षेच्या अर्जात झाला आहे. दुरुस्तीचा विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

एलएलबीच्या सीईटी अर्जात दुरुस्तीची ३ एप्रिलपर्यंत संधी
मुंबई - एलएलबी ३ वर्ष आणि ५ वर्ष अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या परीक्षेचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्तीसाठी आज, १ ते ३ एप्रिलदरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षेच्या अर्जात झाला आहे. दुरुस्तीचा विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या अभ्यासक्रमांचे अर्ज भरताना अनेकदा विद्यार्थ्यांकडून नावासह अन्य गोष्टींमध्ये चुका होतात. मात्र शुल्क भरून अर्ज अंतिम केल्यावर त्यामध्ये विद्यार्थ्यांना दुरुस्ती करता येत नाही. अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जात चुका झाल्याने त्यामध्ये दुरुस्ती करण्याची संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.
अर्ज अपूर्ण असलेल्यांची शुल्क भरून नोंदणी
दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी नोंदणी केली आहे. मात्र त्यांचा अर्ज अपूर्ण आहे, अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरून नोंदणी शुल्क जमा करण्याचा पर्याय सीईटी सेलकडून देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना १ ते ३ एप्रिलदरम्यान अर्ज अंतिम करून नोंदणी शुल्क जमा करता येणार आहे, असे सीईटी सेलने जाहीर केले आहे.
कधी होणार परीक्षा ?
एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा ३ मे आणि ४ मे घेण्यात येणार आहे. तर एलएलबी ५ वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा २८ एप्रिलला होणार आहे.
मागणीची निवेदने विद्यार्थ्यांनी ई-मेल आणि अन्य माध्यमातून सीईटी सेलकडे दिली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन सीईटी सेलने अर्जात दुरुस्तीची सुविधा दिली आहे.