२० हजार कोटींवरून विरोधक आक्रमक, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 02:18 PM2023-04-20T14:18:00+5:302023-04-20T14:18:40+5:30

Gautam Adani meets Sharad Pawar : अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी सिल्व्हर ओकवर येत शरद पवार यांची भेट घेतली. अदानी आणि शरद पवार यांच्यातील ही भेट सुमारे दोन तास चालली. मात्र यादरम्यान, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र समोर येऊ शकलेले नाही. 

Opposition aggressive over 20 thousand crores, Gautam Adani meets Sharad Pawar, sparks discussions | २० हजार कोटींवरून विरोधक आक्रमक, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

२० हजार कोटींवरून विरोधक आक्रमक, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

googlenewsNext

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे उद्योगपती गौतम अदानी अडचणीत सापडले आहेत. तसेच त्यांच्या अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. त्याचदरम्यान, अदानींच्या शेल कंपन्यांमधील २० हजार कोटी रुपयांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही गंभीर आरोप केले होते, तसेच या प्रकरणाच्या जेपीसी द्वारे चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. चौफेर आरोपांमुळे अदानी हे अडचणीत आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी बचाव केला होता. दरम्यान, आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गौतम अदानी सिल्व्हर ओकवर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. 
अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी सिल्व्हर ओकवर येत शरद पवार यांची भेट घेतली. अदानी आणि शरद पवार यांच्यातील ही भेट सुमारे दोन तास चालली. मात्र यादरम्यान, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र समोर येऊ शकलेले नाही. 

अमेरिकेतील फर्म हिंडेनबर्गने जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे अदानी समूह अडचणीत आला होता. अदानी समुहावर अफरातफर आणि अकाऊंटमध्ये फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर अदानी समुहाचे शेअर मोठ्या प्रमाणावर कोसळले होते. मात्र अदानी समुहाने हे आरोप फेटाळून लावले होते.

मात्र गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कथित संबंध आणि हिंडेनबर्गचा अहवाल यामुळे विरोधकांकडून पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर आरोप करण्यात येत होते. नुकत्याच आटोपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. तसेच १९ विरोधी पक्षांनी संयुक्त संसदीय समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरला असतानाच शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे अदानींचा बचाव केल्याने विरोधकांची धार बोथट झाली होती. आता आज पुन्हा एकदा शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

Web Title: Opposition aggressive over 20 thousand crores, Gautam Adani meets Sharad Pawar, sparks discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.