महाविकास आघाडीचा २४ जानेवारीला मोर्चा, सीएए, एनआरसीचा करणार विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:58 AM2020-01-11T04:58:56+5:302020-01-11T04:59:22+5:30

केंद्र सरकारच्या दमनशाही विरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि घटक पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष, संघटना एकवटल्या आहेत.

 Opposition to the Alliance for Leadership Development on January 3, CAA, NRC | महाविकास आघाडीचा २४ जानेवारीला मोर्चा, सीएए, एनआरसीचा करणार विरोध

महाविकास आघाडीचा २४ जानेवारीला मोर्चा, सीएए, एनआरसीचा करणार विरोध

Next

मुंबई : केंद्र सरकारच्या दमनशाही विरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि घटक पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष, संघटना एकवटल्या आहेत. सीएए, एनआरसी आणि एनपीएविरोधात २४ जानेवारीला एकत्रित मोर्चा काढण्यात येणार आहे. दादरच्या हुतात्मा बाबू गेनू उद्यान ते कामगार स्टेडियमपर्यंत हा मोर्चा असणार आहे.
मुंबईत आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, लोक भारती, सीपीआय, सीपीएम, जनता दल सेक्युलर, बीआरएसपी, राष्ट्र सेवा दल, भटके विमुक्त समाज, कामगार संघटना आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत मोर्चाचा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार स्वत: या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. तसेच सर्वपक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांना त्याचे आमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती बैठकीचे निमंत्रक आमदार कपिल पाटील आणि आमदार किरण पावसकर यांनी दिली.
केंद्राने आणलेले कायदे कोणत्या जाती समुहांचा प्रश्न नसून भारतीय नागरिकत्वाचा आणि संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी एकजुटीने केंद्र सरकारच्या विरोधात लढाईला सज्ज व्हावे असे आवाहन आजच्या बैठकीत करण्यात आले. कोणत्याही पक्षाचा झेंडा न वापरता देशाचा तिरंगा हातात घेऊन ‘हम भारत के लोग’ या नावानेच हे आंदोलन सुरू ठेवण्यास राजकीय पक्षांनी संमती दिली.
राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने अलीकडेच देशभरातील विचारवंत, कार्यकर्ते एकत्र आले होते.
त्यावेळी ‘हम भारत के लोग’ या नावाने हे आंदोलन पुढे नेण्याचा निर्णय झाला होता. या बैठकीला सचिन सावंत, मिराज सिद्दीकी, प्रकाश रेड्डी, डॉ. जहीर काझी, सुरेश माने, डॉ. अशोक ढवळे, प्रभाकर नारकर, मलविंदसिंग आदी नेते खुराणा उपस्थित होते.

Web Title:  Opposition to the Alliance for Leadership Development on January 3, CAA, NRC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.