धारावीत झोपड्या पाडण्याच्या मोहिमेला विरोध
By Admin | Published: June 6, 2016 02:45 AM2016-06-06T02:45:15+5:302016-06-06T02:45:15+5:30
धारावीत पुनर्विकास योजनेंतर्गत झोपडपट्टी हटविण्याची मोहीम पावसाळ्यात स्थगित करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे
मुंबई : धारावीत पुनर्विकास योजनेंतर्गत झोपडपट्टी हटविण्याची मोहीम पावसाळ्यात स्थगित करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. पुनर्वसनाचे काम पूर्ण झालेले नाही. मात्र, मोकळ्या झोपड्या हटविताना त्याच्या हादऱ्यामुळे शेजारील झोपड्यांवर परिणाम होत असून, त्यामुळे रहिवाशांचे पावसाळ््यात हाल होणार असल्याने या कारवाईला विरोध होत आहे. धारावीतील सेक्टर ५ परिसरात गेल्या काही वर्षांपासून म्हाडा पुनवर्सन करत आहे.
त्यानुसार, म्हाडाने या ठिकाणी इमारती तयार करून अनेक रहिवाशांचे पुनवर्सन केले आहे, तसेच पुनर्वसन केलेल्या रहिवाशांच्या झोपड्यांत पुन्हा कोणी जाऊ नये, यासाठी म्हाडाने गेल्या १५ दिवसांपासून तोड कारवाईला सुरुवात केली आहे. ही कारवाई होत असताना भिंती अथवा संपूर्ण झोपडीच कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे म्हाडाने पावसाळ््यापुरती ही कारवाई थांबवावी, अशी मागणी धारावी बचाव समितीचे अध्यक्ष बाबुराव माने आणि जनजागृती मंचाचे संस्थापक दिलीप कटके यांनी केली आहे. (प्रतिनिधी)