Join us

प्रचारासाठी उमेदवारांचा आटापिटा

By admin | Published: October 11, 2014 10:49 PM

प्रचारासाठी आता काही कालावधीच शिल्लक असल्याने शेवटच्या टप्प्यातील प्रचार चांगलाच शिगेला पोहोचला आहे.

आविष्कार देसाई - अलिबाग
प्रचारासाठी आता काही कालावधीच शिल्लक असल्याने शेवटच्या टप्प्यातील प्रचार चांगलाच शिगेला पोहोचला आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली, रोड शोचे आयोजन करुन मतदारांर्पयत पोचण्याचा आटापिटा चालविल्याचे दिसून येते.
विविध प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, प्रतिस्पर्धी उमेदवारांची उणीदुणीही काढण्यात आल्याने शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यांच्या सभा चांगल्याच गाजल्या आहेत. काही स्टार प्रचारकांच्या सभा अद्याप बाकी आहेत.
घरोघरी जाऊन मतदारांर्पयत थेट संपर्क साधण्यावर काही उमेदवारांनी विशेष भर गेल्या काही दिवसांत दिला होता. काही उमेदवारांनी हायटेक प्रचार यंत्रणोचा वापरही केल्याचे दिसून आले.सोशल मीडियावरुनही प्रचाराचे रान पेटविण्यात उमेदवार कमी पडल्याचे दिसत नाही. त्यामुळे प्रचाराला चांगलीच रंगत आली होती. 
15 ऑक्टोबर 2क्14 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून 13 ऑक्टोबर 2क्14 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारासाठी अवघा काही कालावधी हातात असल्याने शेवटच्या टप्प्यात मतदारांर्पयत पोचण्यासाठी रॅली, रोड शोचे आयोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. 
विजयाची खात्री असणा:या उमेदवाराच्या प्रचाराची रॅली काढताना प्रमुख राजकीय पक्ष मोठय़ा संख्येने गर्दी जमवून पक्षाची ताकद दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. स्थानिक नेत्यांच्या मानाने राष्ट्रीय, ज्येष्ठ नेत्यांच्या सभांमध्ये मोठी गर्दी होत असून मतदानावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या गर्दीचा फायदा उमेदवाराला होणार असून मतदारांची मते आपल्याकडे खेचण्याचा तसेच प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तंबूत घबराट पसरविण्याचाही प्रयत्न असल्याचे बोलले जाते. रॅली आणि रोड शोसाठी येणा:यांसाठी त्यांच्या दुचाकी वाहनात पेट्रोल टाकणो, त्यांच्या चहा-नाष्टा आणि जेवणाची सोयही करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
 
रेवदंडा :  अलिबाग - मुरुड विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रकाश काठे यांच्या प्रचारासाठी येथील पारनाक्यावर पथनाटय़ सादर करुन मतदारांशी संवाद साधला. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा, आघाडी सरकारने सिंचन व अन्य केलेले घोटाळे, भडकलेली महागाई, भारनियमनाचे संकट, शेतक:यांच्या आत्महत्या अशा एक ना अनेक प्रश्नांनी जनतेला वेठीस धरले असून त्यातून सुटण्यासाठी आणि खेडय़ा - पाडय़ात विकास साधण्यासाठी  कमळाला फुलवा, असे आवाहन पथनाटय़ातून करण्यात आले. दत्ता मोरे (मुंबई), केतन कदम, प्रसाद सावंत, मदनसिंह सोलंकी,सूरज पवार यांनी पथनाटय़ सादर केले.