विरोधी पक्षाची शिवसेना-भाजपावर मात
By admin | Published: April 17, 2016 01:31 AM2016-04-17T01:31:26+5:302016-04-17T01:31:26+5:30
एम पूर्व प्रभाग समितीवरही काँग्रेसने बाजी मारल्यामुळे १७ पैकी तब्बल आठ प्रभागांवर विरोधी पक्षाचा झेंडा फडकला आहे़ तर शिवसेना-भाजपा युतीला नऊ प्रभागांवरच समाधान मानावे लागले आहे़
मुंबई : एम पूर्व प्रभाग समितीवरही काँग्रेसने बाजी मारल्यामुळे १७ पैकी तब्बल आठ प्रभागांवर विरोधी पक्षाचा झेंडा फडकला आहे़ तर शिवसेना-भाजपा युतीला नऊ प्रभागांवरच समाधान मानावे लागले आहे़
पालिकेच्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या़ जादा संख्याबळामुळे स्वतंत्र झालेल्या एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी पार पडली़ यामध्ये शिवसेना-भाजपाच्या उमेदवार मंजू कुमरे यांना तीन मते मिळाली तर समाजवादी पक्षाच्या रेश्मा नेवरेकर यांनाही तीन मते मिळाली़ या दोन उमेदवारांच्या भांडणात काँग्रेसने बाजी मारली़
चार मते मिळवून काँग्रेसच्या खैरनुसा हुसेन विजयी झाल्या़ या प्रभागात १३ सदस्य असून दोन सदस्य गैरहजर होते़ मात्र यामुळे सत्ताधारी पक्षाच्या हातून आणखी एक प्रभाग समिती निसटली़ त्यामुळे काँग्रेसकडे पाच, मनसे दोन, राष्ट्रवादी एक, शिवसेना-भाजपाकडे नऊ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद आहे़ (प्रतिनिधी)
विजयी उमेदवारांची नावे...
एबीई : शहाना खान (काँग्रेस), सी व डी : सरिता पाटील (भाजपा),
एफ दक्षिण/एफ उत्तर : हेमांगी चेंबूरकर (शिवसेना), जी दक्षिण : हेमांगी वांगे (मनसे), पी दक्षिण : लोचना चव्हाण (शिवसेना), पी उत्तर : ज्ञानमूर्ती शर्मा (भाजपा), आर दक्षिण : योगेश भोईर (काँगे्रस), आर उत्तर आणि आर मध्य : शीतल म्हात्रे (शिवसेना), जी उत्तर : सुधीर जाधव (मनसे), के पश्चिम : संजय पवार (शिवसेना पुुरस्कृत), एच पूर्व/एच पश्चिम : कॅरन डिमेला (काँग्रेस), एन प्रभाग : हारुन खान (राष्ट्रवादी काँग्रेस), एस/टी : सुरेश कोपरकर (काँग्रेस), एल : भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार लीना शुक्ला, के पूर्व : शुभदा पाटकर (शिवसेना), एम पश्चिम प्रभाग : दीपा परब (शिवसेना), एम पूर्व : खैरनुसी (काँग्रेस)