Join us

Maharashtra Politics : खासदार संजय राऊतांची पत्रकारांसमोर थुंकून टीका; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 11:15 AM

गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई- गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राऊत वेगवेगळ्या मुद्द्यावरुन चर्चेत येत आहेत. काल त्यांनी केलेल्या टीकेवरुन पुन्हा चर्चेत आले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ठाकरेंना उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील असं श्रीकांत शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला. संजय राऊतांनी प्रश्न ऐकून घेतला आणि विचारले असं कोण म्हणालं. तेवढ्यात पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतलं. श्रीकांत शिंदेंचं नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राजकीय प्रवक्त्यांनी आपल्या राज्याची संस्कृती जपली पाहिजे. आपल्या राज्याला स्व.यशवंतराव चव्हाण यांनी काही परंपरा घालून दिली आहे. संस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो हे देशाला दाखवून दिलं आहे, ते सर्व नेत्यांनी जपलं पाहिजे. प्रत्येक नेत्यांनी तारतम्य ठेवून वागलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले. 

Odisha Train Accident: सलाम तुमच्या कार्याला.! ओडिशा रेल्वे अपघातानंतर रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर रांगा

'पुढ मला दुसरी बाजू ऐकायला मिळाली. यात ते म्हणाले आहेत, मला त्रास होत होता म्हणून तसं झालं.माझा त्यामागील हेतू तो नव्हता, पण प्रत्येकाने तारमत्य ठेऊन वागावं, असंही अजित पवार म्हणाले. 

'नागपुरात दोन दिवसीय चिंतन शिबीर होत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नागपुरात दाखल झाले आहेत. अनेक सेलनी वेगवेगळी शिबीर लावली आहेत, यासाठी मी, जयंत पाटील, अनिल देशमुख आलो आहोत. सर्वच पक्षांचे असे मेळावे होत असतात. आमचं नागपुरात दोन दिवसांच शिबीर पार पडणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेससंजय राऊतशिवसेना