बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 04:26 PM2024-06-29T16:26:30+5:302024-06-29T16:39:05+5:30

Vijay Wadettiwar : मुंबई परिवहन विभागाच्या अंधेरी कार्यालयात तब्बल १२५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Opposition leader Vijay Wadettiwar alleged that scam of 125 crores in Andheri RTO office | बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे

बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे

Andheri RTO Audit Report: राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच राज्याच्या परिवहन विभागाबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मुंबईच्या अंधेरीस्थित प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या वर्षी खोट्या वाहन चालवण्याच्या चाचण्यांच्या आधारे ७६ हजार ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले. महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि भ्रष्टाचार यामुळे आता उघड झाला आहे. बनावट चाचणीच्या आधारे तब्बल ७६ हजार परवाने देण्यात आले आहेत. यानंतर आता मुंबई आरटीओने या प्रकरणात तपास सुरू केला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत अधिवेशनात सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या महालेखापालांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईच्या अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०२३ मध्ये फेक ड्रायव्हिंग टेस्ट'च्या आधारे ७६ हजार ३५४ परवाने जारी केले . या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आरटीओने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे आता ड्रायव्हिंग टेस्ट घेणाऱ्यांमध्ये आणि ड्रायव्हिंग लायसन्सच्या कागदपत्रांमध्ये मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

"मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार. प्रादेशिक परिवहन कार्यालये भ्रष्टाचाराची माहेरघरं झाली आहेत. या आधी आरटीओचा घोटाळा काही नवीन नाही. पण आता अंधेरी येथील आरटीओचा १२५ कोटींचा मोठा घोटाळा समोर आला आहे. या संपूर्ण  प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आज सभागृहात केली आहे. अंधेरी आरटीओने गेल्या वर्षी अनधिकृत वाहनांचा वापर करून बनावट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या आणि त्या आधारे सुमारे ७६ हजार ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले आहेत. अशी लायन्स जारी केल्यानेच पुणे येथे घटलेल्या पोर्शे कार अपघातासारखी प्रकरणे घडत आहेत. दोन दुचाकींवर ४१ हजार ९३ ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले गेले, तर इतर ३५ हजार २६१ ड्रायव्हिंग लायसन्स दोन कारवर देण्यात आले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. माणसं मेली तरी आरटीओना काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त पैसा द्या. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा नाही. आम्हाला फक्त पैसा महत्वाचा आहे. अशा पद्धतीने बेदरकारपणे या कार्यालयाचा कारभार सुरू आहे," असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

दरम्यान, सारथी ऑनलाइन डेटावरून १.०४ लाख ड्रायव्हिंग लायसन्सची तपासणी करताना हा घोटाळा उघडकीस आला. ऑडिटमध्ये १.०४ लाख ड्रायव्हिंग लायसन्सची तपासणी करण्यात आली. यापैकी ७५ टक्के म्हणजे अंदाजे ७, ३५४ ड्रायव्हिंग लायसन्स हे २०२३-२०२४ मध्ये जारी करण्यात आले. त्यामुळे आता त्यामुळे रस्त्यावर वाहने चालवणाऱ्या हजारो चालकांच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दुचाकीसाठी ४१,०९३ तर चारचाकी वाहनांसाठी ३५,२६१ परवाने देण्यात आले होते. यामध्ये चारचाकी वाहनांसाठी परवाने देताना बाईकची ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात आल्याचा निष्कर्ष लेखापरीक्षकांनी काढला आहे.

Web Title: Opposition leader Vijay Wadettiwar alleged that scam of 125 crores in Andheri RTO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.