Join us  

महापालिकेला मिळणार विरोधी पक्षनेता

By admin | Published: April 11, 2017 3:16 AM

महापौरपदाची निवड होऊन महिना उलटल्यानंतर महापालिकेला अखेर विरोधी पक्षनेता मिळणार आहे. महापालिकेच्या विधी खात्याने आपले कायदेशीर मत नोंदवले आहे.

मुंबई : महापौरपदाची निवड होऊन महिना उलटल्यानंतर महापालिकेला अखेर विरोधी पक्षनेता मिळणार आहे. महापालिकेच्या विधी खात्याने आपले कायदेशीर मत नोंदवले आहे. त्यानुसार दोन नंबरचा पक्ष असलेल्या भाजपाने हे पद नाकारल्यास त्यानंतरचे सर्वाधिक संख्याबळ असलेल्या काँग्रेस पक्षाला हे पद देण्याबाबत विचार केला जाणार आहे.निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकांवर असलेल्या भाजपाने पालिकेत कोणत्याही पदाची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही भाजपाने नाकारले आहे. मात्र कायद्यानुसार दोन नंबरच्या पक्षालाच विरोधी नेतेपद देता येत असल्याने पेच निर्माण झाला होता. विरोधी पक्षनेतेपद भाजपा स्वीकारणार नसेल तर त्यानंतरचा मोठा पक्ष म्हणून काँग्रेसने या पदावर दावा केला आहे. काँग्रेसचे रवी राजा यांनी महासभेत हरकतीचा मुद्दा मांडून या पदावर दावा केला होता. त्यानुसार विधी खात्याने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे महापौर महाडेश्वर यांनी भाजपाला पत्र पाठवून विरोधी नेतेपद हवे आहे का, असे विचारले आहे. भाजपाने यापूर्वीच हे पद स्वीकारणार नाही, असे तोंडी जाहीर केले आहे. मात्र हेच उत्तर भाजपाने लेखी दिल्यास विरोधी नेतेपद काँग्रेसकडे जाणार आहे. (प्रतिनिधी)पदावर दावानिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाने पालिकेत कोणत्याही पदाची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही भाजपानेनाकारले आहे. मात्र दोन नंबरच्या पक्षालाच विरोधी नेतेपद देता येत असल्याने पेच निर्माण झाला होता. विरोधी पक्षनेतेपद भाजपा स्वीकारणार नसेल तर नंतरचा मोठा पक्ष म्हणून काँग्रेसने या पदावर दावा केला आहे.