‘पद्मावत’ला विरोध करणारे ताब्यात; महिलेसह ९६ जणांवर कारवाई, सेन्सॉर कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:21 AM2018-01-13T02:21:46+5:302018-01-13T02:22:07+5:30
पद्मावत चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने यू/ए प्रमाणपत्र देत हिरवा कंदील दिला. मात्र करणी सेनेचा विरोध कायम असल्याने तणावाची परिस्थिती कायम असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शुक्रवारी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत गोंधळ घातला.
मुंबई : पद्मावत चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने यू/ए प्रमाणपत्र देत हिरवा कंदील दिला. मात्र करणी सेनेचा विरोध कायम असल्याने तणावाची परिस्थिती कायम असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शुक्रवारी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत गोंधळ घातला. मात्र गावदेवी पोलिसांनी वेळीच त्यांच्यावर कारवाई करत ९६ जणांना ताब्यात घेतले.
‘पद्मावती’ नावावरून सुरू झालेला वाद नावात बदल केल्यानंतरही कायम आहे. ‘पद्मावत’ चित्रपट २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे. करणी सेनेने चित्रपट प्रदर्शित झाल्यास तोडफोड करण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. गावदेवी पोलिसांनी वेळीच त्यांना अडविले. बंदोबस्त वाढवला. कार्यकर्ते एकत्रित निदर्शने करत कार्यालयात तोडफोड करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. यात एका महिलेसह ९६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते दीपक देवराज यांनी दिली.
म्हणे प्रेमप्रसंग हटवा...
करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना भूमिका स्पष्ट केली. ‘राणी पद्मावती आणि अलाउद्दिन खिल्जी यांच्यातील कोणत्याच प्रेमप्रसंगाचे चित्रण केले नसल्याचे स्पष्टीकरण आम्हाला सुरुवातीपासूनच हवे होते. त्याने समाधान झाले असते. मात्र कोणतीही सामंजस्यपूर्ण चर्चा करण्याची आता गरज वाटत नाही,’ असे कालवी म्हणाले.
गावदेवी पोलिसांनी वेळीच त्यांना अडविले. बंदोबस्त वाढवला. कार्यकर्ते एकत्रित निदर्शने करत कार्यालयात तोडफोड करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. यात एका महिलेसह ९६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते दीपक देवराज यांनी दिली.