सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात दादरमध्ये आज विरोधी पक्षांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:19 AM2018-04-01T01:19:50+5:302018-04-01T01:19:50+5:30
मराठी अभ्यास केंद्रातर्फे सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात भूमिका घेण्यासाठी सर्व विरोधी राजकीय पक्षांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी दादर पूर्वेकडील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे.
मुंबई : मराठी अभ्यास केंद्रातर्फे सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात भूमिका घेण्यासाठी सर्व विरोधी राजकीय पक्षांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी दादर पूर्वेकडील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे.
सभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार भाई जगताप, आमदार किरण पावसकर, आमदार वारीस पठाण, मनसे उपाध्यक्ष अभिजित पानसे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने, भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते ज.वि. पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य सचिव मंडळातील प्रकाश रेड्डी, जनता दल सेक्युलरचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रभाकर नारकर उपस्थित राहणार आहेत.
मराठी भाषा विभागाच्या सक्षमीकरणाचा आधीच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला प्रस्ताव पडून आहे.
मराठी भाषा विभागाच्या मंत्र्यांनी सरकारी नोकरशाहीला समांतर जाणारी जी परिवाराची नोकरशाही उभी केली आहे, त्यात केवळ
चर्चा आणि शून्य निर्णय असे
धोरण आहे. डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सादर केलेला
भाषा धोरणाचा मसुदा बस्त्यात पडला
आहे.
मराठी शाळांचा बृहत् आराखडा तडकाफडकी रद्द करून ग्रामीण भागात धडपडत शाळा चालवणाऱ्यांचा आवाज बंद करण्यात आला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा चालवायला देण्याचा निर्णय घेऊन मराठी शाळा कायमच्या बंद करण्याचा हमरस्ता खुला करण्यात आला आहे. भाषा, संस्कृतीच्या प्रश्नांवर सरकारने मराठी समाजाचा विश्वासघात केला आहे. हीच कोंडी फोडण्याचा प्रयत्न सभेतून केला जाणार आहे.