ऑनलाइन पेमेंटसाठी एमएसओ कडून दबाव येत असल्याने शिव केबल सेनेकडून विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 07:24 PM2020-04-10T19:24:43+5:302020-04-10T19:25:06+5:30
कोरोना मुळे लॉकडाऊन लागू असल्याने केबल व्यावसायिकांना ग्राहकांकडून केबलचे शुल्क मिळवणे कठिण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना मुळे लॉकडाऊन लागू असल्याने केबल व्यावसायिकांना ग्राहकांकडून केबलचे शुल्क मिळवणे कठिण झाले आहे. त्यामुळे केबल व्यावसायिक (एलएसओ) व बहुविध सेवा पुरवठादार (एमएसओ) मध्ये मतभेद झाले आहेत.
एमएसओ कडून केबल चालकांना ऑनलाइन पेमेंटसाठी दबाव टाकला जात असल्याने केबल व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिव केबल सेनेने या प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. एमएसओनी केबल व्यावसायिकांना कोरोनाशी केंद्र व राज्य सरकार लढत असताना केबल चालकांना सेवेचे शुल्क देण्यासाठी काही कालावधी वाढवून दिला अनेक वाहिन्यांवर सर्व कार्यक्रम पुनःप्रसारित केले जात आहेत त्यासाठी यापूर्वी शुल्क भरण्यात आले होते. केबल चालकांसाठी प्रीपेड व पोस्टपेड पेमेंट प्रक्रिया उपलब्ध आहे त्यामुळे सध्याच्या कालावधीत केबल चालकांसाठी पोस्टपेट पेमेंट सेवेचा वापर करणे गरजेचे आहे. केबल चालकांच्या मार्फत आलेल्या ग्राहकांकडून ऑनलाइन पेमेंट घेण्यासाठी केबल चालकांवर दबाव टाकून ग्राहकांना थेट ऑनलाइन पेमेंट देण्यासाठी सक्ती केली जात आहे. हे अत्यंत अनुचित असून शिव केबल सेनेने या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवला आहे. शिव केबल सेनेचे सरचिटणीस राजू पाटील यांनी हा प्रकार अत्यंत चुकीचा असून हे प्रकार त्वरित रोखण्याची गरज व्यक्त केली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक एप्रिलला जारी केलेल्या परिपत्रकानुसार लॉकडाऊनच्या काळात केबल सेवा अबाधित ठेवण्याचे निर्देश दिले होते. केबल ग्राहकांचे शुल्क मिळाले नाही तरी विनामूल्य वाहिन्यांचे प्रक्षेपण सुरु ठेवण्यात यावेत असे स्पष्ट करण्यात आले होते. या परिपत्रकाची नोंद घेऊन एमएसओनी कार्यवाही करावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे. केबल सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने ही सेवा विनाव्यत्यय सुरु ठेवण्यात यावी
या निर्देशांकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.