आरे कारशेडला पर्याय गोरेगाव येथील परेड ग्राउंडचा, राष्ट्रवादी काँग्रेसने सुचविला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 05:15 AM2019-12-02T05:15:36+5:302019-12-02T05:15:46+5:30

या मैदानाचा वापर सध्या फक्त लग्नसोहळ्यांसाठी होत आहे.

Option for Aarey Carshed: Parade Ground at Goregaon | आरे कारशेडला पर्याय गोरेगाव येथील परेड ग्राउंडचा, राष्ट्रवादी काँग्रेसने सुचविला पर्याय

आरे कारशेडला पर्याय गोरेगाव येथील परेड ग्राउंडचा, राष्ट्रवादी काँग्रेसने सुचविला पर्याय

Next

मुंबई : आरे येथील मेट्रो कारशेडला राष्ट्रवादी कॉँग्रेसने पर्यायी जागा सुचविली आहे. गोरेगाव येथील राज्य राखीव दलाच्या परेड ग्राउंडवर पुरेशी जागा उपलब्ध असल्याने, प्रस्तावित कारशेड या ठिकाणी उभारण्याची मागणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई
अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे.
याबाबत माहिती देताना राष्ट्रवादीचे नवाब मलिक म्हणाले की, फडणवीस सरकारने आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय
घेतला होता. मुंबईकरांनी या निर्णयाला विरोध केला असतानाही प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न झाला. आरेशिवाय कारशेडला पर्याय नाही, अन्यथा मेट्रोचे काम पूर्ण होणारच नसल्याची भूमिका प्रशासनाने मांडली होती. मुंबईकरांनी विविध पर्याय सुचविले होते. त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आम्ही विधानसभेमध्ये असताना उद्धव ठाकरे यांना पर्यायी जागा सुचविली आहे. गोरेगाव येथे १०२ हेक्टर जागेवर राज्य राखीव पोलीस दलाचे (आरपीएफचे) मैदान आहे.
या मैदानाचा वापर सध्या फक्त लग्नसोहळ्यांसाठी होत आहे. मेट्रो कारशेडला साधारण ५२ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे आरपीएफच्या या परेड ग्राउंडच्या एका भागात कारशेड उभारता येईल, असा दावा मलिक यांनी केला.
जंगलाचा ºहास आणि वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका असल्याचे सांगत, शिवसेनेने आरे येथील मेट्रो कारशेडला विरोध
केला होता. विशेषत: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणप्रेमींसह या मुद्द्यावर आक्रमक भूमिका
घेतली होती. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकार आणि मुंबई
मेट्रो रेले कार्पोरेशनने हे प्रकरण
प्रथम उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले.
दोन्ही ठिकाणी सरकारची भूमिका मान्य करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर मेट्रो प्रशासनाने
रातोरात आरे येथील २,६४६
झाडे तोडली. अशा प्रकारे रातोरात झाडांची कत्तल झाल्यानंतर
त्याचे तीव्र पडसादही उमटले.
शिवाय, आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच, मुख्यमंत्री ठाकरे यांनी कारशेडच्या कामाला स्थगितीचे आदेश दिले. विकासकामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकासकामे केली जाणार नाहीत.

तातडीने सादर करा अहवाल
- कारशेडच्या कामाला स्थगिती देतानाच,
याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्या
सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.
- या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत आरेतील पानालाही धक्का लागता कामा नये, अशी ताकीद मुख्यमंत्र्यांनी दिली.

Web Title: Option for Aarey Carshed: Parade Ground at Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो