मुंबई : मागील अनेक कालावधीपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यापासून राज्यातील एसटी सेवा बंद होती. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे एसटी महामंडळाला नुकसान झालेले आहे. एसटीला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे दीड पट भाडेवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावानुसार तिकिट दरात ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही भाडे वाढीच्या प्रस्तावावर अंतिम मंजुरी मिळाली नाही.
एसटी महामंडळाचा संचित तोटा ६ हजार रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे. तर, कोरोनामुळे दररोज एसटी महामंडळाला २२ कोटी रुपयाचे महसुलाचे नुकसान होत आहे. आतापर्यत एसटीला तब्बल १ हजार ५०० कोटी पेक्षा जास्त रुपयाचे नुकसान झाले आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागातील एसटी बसेसच्या विशेष फेऱ्या धावत आहे. नॉन रेड झोन मध्ये एसटीची जिल्हातंर्गत वाहतुक हळूहळू पूर्व गतीवर येत आहे.ही वाहतुक करताना फिजिकल डिन्सिन्सिंगचे पालन करण्यासाठी एका आसनावर एकच प्रवासी बसविला जातो. फक्त २२ प्रवासी बसमध्ये घेतले जाते.त्यामुळे महामंडळाचा तोटात आणखी भर पडणार आहेत. त्यामुळे तोटा भरून काढण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.याच दीड भाडेवाढीची मागणी केली आहे.सध्या पहिल्या टप्यासाठी एसटीकडून १० रुपये तिकिट आकारले जाते. भाडेवाढी राज्य सरकार आणि राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाली तर १० रुपयांचे तिकिट १५ रुपये होणार आहे.