Join us

विद्यापीठांमध्ये एकाच वेळी घ्या दोन पदव्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 08:59 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाच वेळी दोन पदव्या किंवा संयुक्त पदव्या मिळवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

प्रा. रवींद्र कुलकर्णीकुलगुरू, मुंबई विद्यापीठ

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुविद्याशाखा शिक्षणाला चालना देण्यासाठी औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही पद्धतींचा समावेश असलेल्या पदवी शिक्षणाचे अनेक मार्ग सुलभ करण्यात आले आहेत. एखाद्या व्यक्तीला एक किंवा अधिक विशेष क्षेत्रांमध्ये आवड असेल तर, त्या विषयांचा सखोल स्तरावर अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीला सक्षम करण्याच्या गरजेवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर दिला आहे. विद्यार्थ्यांमधून विचारशील, उत्तम आणि सर्जनशील व्यक्ती घडवण्यासाठी त्याला विज्ञान, सामाजिक विज्ञान, कला, मानव्यविद्या, भाषा, तसेच व्यावसायिक आणि तांत्रिक विषयांसह विविध विषय देण्याची तरतूद शैक्षणिक धोरणात आहे. उच्च शिक्षणाच्या मागणीत झपाट्याने होणारी वाढ आणि पारंपरिक अभ्यास शाखांमधील प्रवेशांच्या जागांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे अनेक उच्च शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण प्रणालीमध्ये विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाच वेळी दोन पदव्या किंवा संयुक्त पदव्या मिळवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

दुहेरी पदवीसाठीची मार्गदर्शक तत्त्वे 

विद्यार्थी दोन पूर्णवेळ शैक्षणिक अभ्यासक्रम वर्गात बसण्याच्या पद्धतीने म्हणजे फिजिकल मोडमध्ये पूर्ण करू शकतील. अर्थात, या दोन्ही अभ्यासक्रमांच्या वेळा एकमेकांपेक्षा वेगळ्या असल्या पाहिजेत.

विद्यार्थी दोन शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत एक प्रत्यक्ष वर्गात बसण्याच्या पद्धतीने आणि दुसरा मुक्त आणि दूरस्थ पद्धतीचा म्हणजे ओपन अँड डिस्टन्स लर्निंग किंवा ऑनलाइन मोडमध्ये; किंवा ते एकाच वेळी दोन्ही अभ्यासक्रम मुक्त आणि दूरस्थ पद्धतीचेही घेऊ शकतील.

विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेल्या फक्त त्याच उच्च शिक्षण संस्थांमध्ये सुरू असलेल्या मुक्त आणि दूरस्थ / ऑनलाइन मोड अंतर्गत पदवी किंवा पदविका कार्यक्रम विद्यार्थी निवडू शकतील.

ही मार्गदर्शक तत्त्वे पीएच.डी. व्यतिरिक्त इतर शैक्षणिक अभ्यासक्रमात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू होतील. या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे, राज्य विद्यापीठे एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम राबवू देण्यासाठी यंत्रणा तयार करू शकतील.

दुहेरी पदवीच्या शिक्षणाअंतर्गत विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालये किंवा दोन शिक्षण संस्थांमध्ये एकाच वेळी प्रवेश घेता येईल. दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमाअंतर्गत दोन्ही पदव्या डिस्टन्स / ऑनलाइन मोडमध्ये किंवा एका प्रत्यक्ष आणि एका डिस्टन्स मोडमध्ये दिली जाऊ शकेल. याव्यतिरिक्त, या तरतुदीअंतर्गत दोन्ही पदव्या प्रत्यक्ष मोडमध्ये एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतील. दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमांतर्गत सहभागी संस्था / विद्यापीठांनी क्रेडिट्स किंवा कोर्सेसचे ओव्हरलेंपिंग होणार नाही याची खात्री करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर प्रत्यक्ष मोडमध्ये दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी दोन्ही संस्थांमधील अंतर ५-२० कि.मी. असणे आवश्यक आहे.

सह अथवा संयुक्त पदवी सहपदवी 

अभ्यासक्रम हा सहयोगी उच्च शैक्षणिक संस्थांद्वारे संयुक्तपणे तयार केलेला असेल. एक विद्यापीठ किंवा एखाद्या महाविद्यालयात नावनोंदणी केलेले विद्यार्थी त्यांच्या यजमान संस्थेत काही सत्रांसाठी अध्ययन करू शकतात आणि यजमान संस्थेसोबत सहयोगी असलेल्या दुसऱ्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेत उर्वरित सत्रांना उपस्थित राहून त्यांची संयुक्त पदवी मिळवू शकतात. विद्यार्थी अशा प्रकारे शैक्षणिक अभ्यासक्रमाचा काही भाग यजमान संस्थेमध्ये आणि उर्वरित अभ्यासक्रमाचा भाग भागीदार संस्थेमध्ये योग्य श्रेयांक हस्तांतरण यंत्रणेच्या सुविधेद्वारे करू शकतो. संस्थेतील , या तरतुदीअंतर्गत दोन्ही पदव्या प्रत्यक्ष मोडमध्ये एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतील. दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमांतर्गत सहभागी संस्था / विद्यापीठांनी क्रेडिट्स किंवा कोर्सेसचे ओव्हरलेंपिंग होणार नाही याची खात्री करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर प्रत्यक्ष मोडमध्ये दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी दोन्ही संस्थांमधील अंतर ५-२० कि.मी. असणे आवश्यक आहे. सह अथवा संयुक्त पदवी सहपदवी अभ्यासक्रम हा सहयोगी उच्च शैक्षणिक संस्थांद्वारे संयुक्तपणे तयार केलेला असेल. एक विद्यापीठ किंवा एखाद्या महाविद्यालयात नावनोंदणी केलेले विद्यार्थी त्यांच्या यजमान संस्थेत काही सत्रांसाठी अध्ययन करू शकतात आणि यजमान संस्थेसोबत सहयोगी असलेल्या दुसऱ्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेत उर्वरित सत्रांना उपस्थित राहून त्यांची संयुक्त पदवी मिळवू शकतात. विद्यार्थी अशा प्रकारे शैक्षणिक अभ्यासक्रमाचा काही भाग यजमान संस्थेमध्ये आणि उर्वरित अभ्यासक्रमाचा भाग भागीदार संस्थेमध्ये योग्य श्रेयांक हस्तांतरण यंत्रणेच्या सुविधेद्वारे करू शकतो. संस्थेतील अभ्यासक्रमासाठी मिळालेले श्रेयांक हे दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे प्रदान केलेल्या पदवी प्रदान करताना मोजले जातील. विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर, त्यांना दोन्ही भागीदार उच्च शिक्षण संस्थांद्वारे एकाच प्रमाणपत्रासह पदवी प्रदान केली जाईल.

द्विनिंग पदवी 

द्विनिंग पदवी अभ्यासक्रमांची रचना ही दोन उच्च शिक्षण संस्थांद्वारे सहकार्याने केली जाईल. द्विनिंग पदवी व्यवस्थेअंतर्गत, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची नोंदणी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठांमध्ये नोंदणी केली जाईल; परंतु, ते त्यांच्या अभ्यासक्रमाचा काही भाग हा यूजीसीने मान्यता दिलेल्या आणि संबंधित विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थांशी सहयोगी झालेल्या भारतातील विद्यापीठांमध्ये किंवा उच्च शिक्षण संस्थांमध्ये पूर्ण करू शकतील. या अभ्यासक्रमांसाठी संस्थांना शैक्षणिक सामंजस्य करार करावा लागेल. ही पदवी केवळ यजमान महाविद्यालये किंवा विद्यापीठांनाच प्रदान करता येईल. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले श्रेयांकांचे अभ्यासक्रम हे एकमेकांच्या अभ्यासक्रमांना ओव्हरलेंपिंग करणारे नसावेत, याची दक्षता संस्थांना घ्यावी लागेल.