Join us

पीएचडी विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 7:57 PM

पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांचे प्रबंध सादर झाले असतील व रेफ्री रिपोर्ट आले असतील तर सदर विद्यार्थ्यांचा व्हायवा (तोंडी परीक्षा ) ऑनलाईन पद्धतीने घ्यावी.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने संलग्नित कॉलेजांतील प्राचार्य, संचालक आणि विद्यापीठ शैक्षणिक विभागप्रमुखांशी नुकताच संवाद साधला. यावेळी विद्यापीठाची स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. मात्र पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांचे प्रबंध सादर झाले असतील व रेफ्री रिपोर्ट आले असतील तर सदर विद्यार्थ्यांचा व्हायवा (तोंडी परीक्षा ) ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.अंतिम सत्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असून महाविद्यालयांनी घ्यावयाच्या परीक्षा, गुणांचे नियोजन, अंतर्गत मूल्यांकन, ग्रेडींग पॅटर्न, एटीकेटी अशा अनुषंगिक बाबींवर कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी सखोल चर्चा केली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक व परीक्षांचे वेळापत्रक यांचा आराखडा आपण लवकरच सादर करू असे त्यांनी संगितले आहे. मात्र पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांची होणारी तोंडी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.एल.एल. एम. शेवटच्या सत्रात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा देखील त्यांच्याकडून अपेक्षित कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने विधी विभागात स्वीकारण्यास अनुमती देऊन त्यांचा व्हायवा (तोंडी परीक्षा ) ही ऑनलाईन घेण्यात यावा,अशी मागणी केल्याची माहिती सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. कुलगुरूंनी साधला संवादकुलगुरूंनी महाविद्याल्यांशी साधलेल्या संवादात पहिल्या टप्प्यात कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयांचे प्राचार्य, व्यवस्थापन संस्थांचे संचालक अशा ४७६ तर दुसऱ्या टप्प्यात अभियांत्रिकी, फार्मसी, विधि, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य-संचालक अशा ३२६ आणि शेवटच्या टप्प्यात विद्यापीठ विभागातील ५५ विभागप्रमुख आणि संचालक अशा एकूण ८५७ प्राचार्य, संचालक आणि विभागप्रमुखांशी आभासी पद्धतीने संवाद साधण्यात आला.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याशिक्षण क्षेत्रमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस