कोकणातील दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 06:35 AM2021-09-05T06:35:22+5:302021-09-05T06:36:31+5:30

६ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना तर ७ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Orange alert to both the districts of Konkan | कोकणातील दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

कोकणातील दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

googlenewsNext
ठळक मुद्देकिनारपट्टीवरील मच्छीमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. खोल समुद्रात बोटी नेऊ नयेत, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत असतानाच रविवारसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर यलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना तर ७ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ८ सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
किनारपट्टीवरील मच्छीमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. खोल समुद्रात बोटी नेऊ नयेत, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली असून, शनिवारी मुंबईतदेखील तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रविवारीदेखील मुंबईत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Web Title: Orange alert to both the districts of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस