मध्य, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला ऑरेंज अलर्ट; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 06:38 AM2023-03-16T06:38:10+5:302023-03-16T06:38:35+5:30

विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

orange alert for central north maharashtra vidarbha warning to which districts | मध्य, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला ऑरेंज अलर्ट; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

मध्य, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला ऑरेंज अलर्ट; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलांमुळे गुरुवारी मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या विभागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. दुसरीकडे मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे, नवी मुंबईसह रायगड परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण नोंदविण्यात आल्याने कमाल तापमानात घट झाली असतानाच गुरुवारसह शुक्रवारी मुंबईतही अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.  

सातारा, काेल्हापुरात पाऊस बुधवारी सातारा शहरासह वाई, जावळी, पाटण तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पिकांना मोठा फटका बसला. पाचगणीत वीज पडून दोन म्हशी ठार झाल्या.

येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यांत काही ठिकाणी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होईल. सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. १६-१७ मार्च रोजी गारपिटीची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी. - कृष्णानंद होसाळीकर,     अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग

कोणत्या जिल्ह्यांना इशारा

१६ मार्च : पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली
१७ मार्च : अहमदनगर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: orange alert for central north maharashtra vidarbha warning to which districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस