Join us

राज्यभरात उद्या 'कोसळधारा', तीन जिल्ह्यांना 'ऑरेंज' तर १५ जिल्ह्यांत 'यलो' अलर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 5:11 PM

rain in mumbai : मुंबईसह राज्यभरात दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होत आहे.

rain update in maharashtra | मुंबई : मुंबईसह राज्यभरात दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होत आहे. आजपासून मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. खरं तर अद्याप ग्रामीण भागात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. पण येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. लक्षणीय बाब म्हणजे २१ जुलैपर्यंत राज्यातील तीन जिल्ह्यांना मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि पुणे या तीन जिल्ह्यात २१ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार अर्थात 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार असून, येत्या चार-पाच दिवस पावसाचा प्रभाव थोडा अधिक राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

१५ जिल्ह्यांना यलो अलर्ट मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा परतला आहे. हवामान विभागाने पंधरा जिल्ह्यांना उद्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, जिल्ह्यात 'यलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.  

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रपाऊसपुणे