मुंबई : मुंबईसह राज्यभरात दाखल झालेल्या मान्सूनने आपली बरसात सुरू ठेवली असतानाच जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, खूप दिवसांनी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, त्यानुसार गुरुवारी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि ज्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे; त्या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काय होणार?६ आणि ७ जुलैला ऑरेंज अलर्ट५ जुलैच्या रात्रीपासून पावसाच्या तीव्रतेत वाढमुसळधार सरी गुरुवारपर्यंत वाढतील६ आणि ७ तारखेला मुसळधार पाऊस पडेलकाही ठिकाणी पूरसदृश स्थिती दोन दिवस १५० मिमी पेक्षा जास्त पाऊस