Join us  

मुंबईकरांनो...आज ऑरेंज अलर्ट! मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार

By सचिन लुंगसे | Published: July 11, 2024 6:08 PM

१७, १८ आणि १९ धोक्याचे; पुरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी दिवसभर पावसाने तुरळक ठिकाणी दमदार लावली असतानाच शुक्रवारसह शनिवारी आणि रविवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर १७, १८ आणि १९ जुलै रोजी कोसळणा-या पावसामुळे मुंबई पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.८ जुलै रोजी कोसळलेल्या पावसाने मुंबईत अघोषित बंद केल्यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. आता मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून, गुरुवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत सर्वत्र हजेरी लावली. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळपासून सुरु झालेला पाऊस अधून-मधून रिपरिप पडत होता. तर शहरातही सायंकाळी ५ वाजेपर्यंत पावसाची सर्वसाधारण स्थिती होती. कुठे तरी पडलेली मोठी सर वगळता पाऊस दिवसभर लागून होता.१७, १८ आणि १९ या तारखांबाबत आता बोलणे उचित होणार नाही. मात्र शुक्रवारसह शनिवारी मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

शुक्रवार, शनिवार आणि रविवारी एकूण ३०० मिलीमीटर पाऊस पडू शकतो. शिवाय १७, १८ आणि १९ या दिवशी कदाचित मोठया पावसाची शक्यता असून, मुंबईत पुरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.- अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक१३ जुलैपर्यंत कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार तर खान्देशात मध्यम ते जोरदार व मराठवाड्यातील जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. १४ जुलैपासून १८ जुलैपर्यंत मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या तेथील पावसापेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम जाणवते.- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञशुक्रवार - ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा या जिल्हयांना ऑरेंज अलर्टशनिवार -  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्हयांना ऑरेंज अलर्टरविवार - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयांना ऑरेंज अलर्टसोमवार - रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हयांना ऑरेंज अलर्ट

टॅग्स :मोसमी पाऊस