Join us

कोकण, मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:06 AM

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : येत्या पाच दिवसांसाठी कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ...

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : येत्या पाच दिवसांसाठी कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातदेखील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दि. १८ व १९ जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली.

महाराष्ट्र किनारपट्टीपासून उत्तर केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. गेल्या २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस नोंदविण्यात आला आहे. विदर्भातदेखील अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. दि. १७ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात जोरदार वारे वाहतील. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची नोंद होईल. दि. १८ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी नोंदविण्यात येईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता आहे.

१७ जुलै - रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

१८, १९ आणि २० जुलै - मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.