केशरी शिधापत्रिकाधारकांना जूनमध्येही सवलतीत अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 09:27 AM2021-05-27T09:27:48+5:302021-05-27T09:28:27+5:30

ration card: मागच्या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता.

Orange ration card holders also get discounted foodgrains in June | केशरी शिधापत्रिकाधारकांना जूनमध्येही सवलतीत अन्नधान्य

केशरी शिधापत्रिकाधारकांना जूनमध्येही सवलतीत अन्नधान्य

Next

मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यांचे सवलतीच्या दरात जूनमध्ये पुन्हा वाटप करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

मागच्या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत पुन्हा जूनमध्ये अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी माहिती देताना भुजबळ म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अन्नधान्यांचे राज्यात मोफत वितरण चालू आहे. त्याचबरोबर आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील ७१ लाख ५४ हजार ७३८ एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ होणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Web Title: Orange ration card holders also get discounted foodgrains in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.