Join us

रेस्टॉरंटच्या अनधिकृत पोटमाळ्यावर आॅर्केस्ट्राचा परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 2:42 AM

मुंबई पोलिसांच्या हॉटेल शाखेने त्या रेस्टॉरंटच्या पोटमाळ््यावर आॅर्केस्ट्राचा परवाना दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई : घाटकोपर येथील दशमेश पंजाब बार आणि रेस्टॉरंटच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंजूर केलेल्या नकाशात पोटमाळा नसतानाही मुंबई पोलिसांच्या हॉटेल शाखेने त्या रेस्टॉरंटच्या पोटमाळ््यावर आॅर्केस्ट्राचा परवाना दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या रेस्टॉरंटच्या पोटमाळ््याला मुंबई महापालिकेने परवानगी दिलेली नाही.घाटकोपर येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील नारायण नगरातील दशमेश पंजाब बार आणि रेस्टॉरंटला देण्यात आलेला आॅर्केस्ट्राचा परवाना तळमजल्यावर की पोटमाळ््यावर देण्यात आला, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते मनोहर जरीयाल यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त (मुख्यालय) यांच्याकडे माहिती मागवली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंजूर नकाशानुसार या रेस्टॉरंटच्या पोटमाळ््यावर आॅर्केस्ट्राला परवानगी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रत्यक्षात या मंजूर नकाशात पोटमाळाच नसल्याचे जरीयाल यांनी सांगितले.याबाबत जरीयाल यांनी हे रेस्टॉरंट तळमजला आणि पोटमाळा अशा स्वरूपात असल्याने पोटमाळ््याचा आकार किती आहे, अशी विचारणा महापालिकेच्या एल विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे माहिती अधिकाराअंतर्गत केली असता पोटमाळ््याला परवानगी नसल्याने रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध नसल्याची माहिती दिली.या विसंगत माहितीमुळे जरीयाल यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना तक्रारीचे निवेदन सादर केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या नकाशानुसार रेस्टॉरंटला केवळ तळमजला आहे.मंजूर नकाशानुसार अस्तित्वात नसलेल्या पोटमाळ््यावर आॅर्केस्ट्राचा परवाना देण्यात आला आहे. हा प्रकार भ्रष्टाचारातून झाल्याने अशा तºहेने परवाना देणाºया अधिकाºयाची चौकशी करून याबाबत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जरीयाल यांनी आयुक्तांकडे केली आहे.