Join us

बालसंगोपन रजेचा आदेश निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 4:06 AM

रजेवर जातानाचे वेतन रजा काळात मिळणार

मुंबई : राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना तसेच पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाºयांना सहा महिन्यांपर्यंतची बालसंगोपन रजा देण्यात येणार असून त्यासाठीचा आदेश वित्त विभागाने सोमवारी काढला. संपूर्ण सेवाकाळात १८० दिवसांची बाल संगोपन रजा दिली जाणार असून एका वर्षात कमाल दोन महिनेच ही रजा घेता येणार आहे.मुल १८ वर्षांचे होईपर्यंतच रजा घेता येईल. शासकीय सेवेचे एक वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाºयांनाच ती मिळेल आणि पहिल्या दोन मोठ्या अपत्यांसाठी लागू असेल. अर्जित रजा, प्रसूती रजेला जोडून ती घेता येईल. बाल संगोपन रजेवर जातानाचे वेतन रजा काळात मिळेल.ही रजा हक्क म्हणून मागता येणार नाही. सक्षम प्राधिकाºयाच्या पूर्वमान्यतेने ती मिळेल आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊनच ती दिली जाईल. संबंधित कर्मचाºयाची वारंवार रजा घेण्याची प्रवृत्ती नाही ही बाब देखील रजा मंजूर करताना विचारात घेतली जाणार आहे.परिविक्षाधीन (प्रोबेशन) कालावधीत बालसंगोपन रजा दिली जाणार नाही. मात्र, अशा कर्मचाºयाच्या मुलांबाबत गंभीर परिस्थितीमुळे रजा घेणे अत्यावश्यक असेल तर अपवादात्मक परिस्थितीत ती दिली जाणार आहे.निकष लवकरच जाहीर करणारपत्नी असाध्य आजाराने अंथरुणास खिळलेली आहे अशा पुरुष कर्मचाºयास त्याच्या अपत्याच्या संगोपनासाठी रजा दिली जाणार आहे. त्याचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील.राज्य शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कृषी व बिगर कृषी विद्यापीठांतील कर्मचाºयांना ही रजा लागू असेल.

टॅग्स :मुंबई